Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

त्वचा रोग ओळखण्यासाठी आता स्मार्ट फोन होणार डॉक्टर! एम्सचा स्मार्ट शोध!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
AIIMS APP for skin diseases

मुक्तपीठ टीम

ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजेच एम्सने स्टार्टअप फर्म नुरिथम लॅबच्या सहकार्याने एक स्मार्टफोन अॅप लाँच करण्यात आला आहे. त्वचारोगांवरील उपचार सुधारण्यासाठी आणि अचूकता राखण्यासाठी, त्वचारोगाच्या आजारांवर उपचारासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाईल. अॅपने छायाचित्रे घेतल्याने डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करण्यास आणि रोग समजण्यास मदत होईल. अॅपचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागात होऊ शकतो.

कसं काम करणार हे नवं तंत्र?

  • DermaAid चे मोबाईल अॅप त्वचेच्या आजारांवर उपचार करण्यासाठी एक विशेष तंत्रज्ञान मशीन-लर्निंग AI-पॉवर अल्गोरिदम वापरेल.
  • त्वचेचे फोटो काढण्यासाठीही यामध्ये कॅमेरा वापरला जातो.
  • ऍपच्या माध्यमातून सामान्य डॉक्टरांनाही त्वचेच्या आजारांबाबत चांगली माहिती मिळू शकणार आहे.
  • प्राध्यापक डॉ. सोमेश गुप्ता यांनी स्पष्ट केले की, सामान्य डॉक्टरांमध्ये त्वचारोगतज्ज्ञांच्या तुलनेत केवळ ४० ते ५० टक्के उपचार होतात.

त्वचारोग हा चौथा मोठा प्राणघातक आजार!

  • अॅप ८० टक्के अचूकतेने मुरुम, सोरायसिस, त्वचारोग, टिनिया, एक्जिमा, मेल एलोपेशिया, बेसल सेल कार्सिनोमा, स्क्वॅमस सेल कार्सिनोमा आणि मेलेनोमा यांसारख्या त्वचेच्या कर्करोगाचे विविध प्रकार शोधू शकतात.
  • भारतात केवळ १२.५ लाख अॅलोपॅथिक डॉक्टर आहेत, त्यापैकी फक्त ३.७१ लाख विशेषज्ञ किंवा पदव्युत्तर पात्रता आहेत.
  • अॅपच्या माध्यमातून ग्रामीण भागात जेथे सर्वसामान्य डॉक्टर सहज उपलब्ध होत नाहीत, तेथे आरोग्य कर्मचारी तातडीने उपचारात सहभागी होऊ शकतात.

अॅपबद्दल प्राध्यापक डॉ. सोमेश गुप्ता म्हणाले की, अॅपमागील तंत्रज्ञान सोपे आहे. यामध्ये डॉक्टर रुग्णाच्या शरीरावरील जखमांचे फोटो काढून क्लाउड सर्व्हरवर अपलोड करतील. १५ ते ३० सेकंदात अॅप मशीनच्या विश्लेषणावर आधारित रोगाची माहिती देईल. ते म्हणाले देशात मोठ्या प्रमाणात त्वचेचे संक्रमण दिसून येत आहे. त्यावर स्टिरॉइड्सचा उपचार केला जातो. हे अॅप स्टिरॉइड क्रीम आणि फंगल संसर्ग समस्येचा सामना करण्यास मदत करेल. आतापर्यंत ५०हून अधिक त्वचारोग DermaMed द्वारे ओळखले जाऊ शकतात. मात्र, या वर्षाच्या अखेरीस ही संख्या आणखी वाढेल.

 


Tags: aiimsgood newsmuktpeethskin diseasessmart phonesStartup firm Nuritham Labएम्सचांगली बातमीत्वचा रोगमुक्तपीठस्टार्टअप फर्म नुरिथम लॅबस्मार्ट फोन
Previous Post

मोटू-पतलू शिकवणार कराविषयीचं सर्वकाही! अर्थमंत्रालयाचं कॉमिक्स बुक!!

Next Post

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात, देहू आणि मुंबईत कार्यक्रम!

Next Post
Pm Modi Visit Maharashtra Today

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात, देहू आणि मुंबईत कार्यक्रम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!