मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या एक एप्रिल रोजी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियम येथे ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात भाग घेणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांशी संवाद साधत असतात. तणावमुक्त परीक्षा याबद्दल ते बोलणार आहेत. आपल्या ट्विटर हँडलवर पंतप्रधानांनी ‘परीक्षा पे चर्चा’ बद्दल संदेश दिला आहे. ते म्हणालेत, “चला पुन्हा एकदा तणावमुक्त परीक्षांबद्दल बोलूया! गतीमान #ExamWarriors, त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना 1 एप्रिल रोजी या वर्षीच्या परीक्षा पे चर्चामध्ये सामील होण्याचे आवाहन करत आहोत.”
त्यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे.
Pariksha Pe Charcha is interactive, light hearted and gives us all the opportunity to talk about different aspects of exams, studies, life and more… pic.twitter.com/fkXVRY7GNB
— Narendra Modi (@narendramodi) March 26, 2022
काय आहे ‘परीक्षा पे चर्चा’?
- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांशी संवाद साधत असतात.
- १ एप्रिल २०२२ रोजी होणाऱ्या पाचव्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात ते भाग घेतील.
- ‘परीक्षा पे चर्चा’ म्हणजे PPC 2022 मध्ये परदेशातून शिक्षक आणि विद्यार्थी देखील सामील होतील.
- सर्व शालेय विद्यार्थी परीक्षा पे चर्चा २०२२ मध्ये सहभागी होऊ शकतील.
- सोशल मीडिया आणि दूरदर्शनसह सर्व टीव्ही वृत्तवाहिन्यांवरही त्याचे थेट प्रक्षेपण केले जाते.
- यामध्ये परदेशातील शिक्षक व विद्यार्थीही सहभागी होणार आहेत.
सर्जनशील लेखन स्पर्धेत १५.७ लाख उमेदवारांनी सहभाग घेतला
- यावर्षी परिक्षा पे चर्चा स्पर्धेअंतर्गत सुमारे 15.7 लाख उमेदवारांनी सर्जनशील लेखन स्पर्धेत भाग घेतला आहे.
- मंत्रालयाने सांगितले की हा पंतप्रधानांचा एक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षांच्या तणावावर मात करण्यासाठी आणि त्यांची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी अनमोल टिप्स दिल्या जातील.
- केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागातर्फे गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे.
- गेल्या वर्षी ७ एप्रिल २०२१ रोजी परिक्षा पे चर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.