Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन: “भाजपानं ठरवावं २५ वर्षांचं लक्ष्य!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
PM modi (5)

मुक्तपीठ टीम

राजस्थानच्या जयपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची तीन दिवसीय बैठक सुरू आहे. शुक्रवारी, बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांना संबोधित केले, “आज जग भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. त्याचप्रमाणे भारतातील जनतेचा विश्वास भाजपावर आहे. भाजपाने आता पुढील २५ वर्षांचे लक्ष्य निश्चित ठरवलं पाहिजे!”

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पक्षाकडे आशेने आणि विश्वासाने पाहणाऱ्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने काम करण्यावर भर देण्यास सांगितलं. या बैठकीत गुजरात आणि हिमाचलच्या या वर्षी होणाऱ्या निवडणुका, पुढील वर्षी होणाऱ्या अनेक राज्यांच्या निवडणुका तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली.

मोदी पुढे म्हणाले, “जनसंघापासून सुरू झालेला आमचा प्रवास भाजपा म्हणून भरभराटीला आला, पक्षाचे हे रूप, त्याचा विस्तार पाहिला तर अभिमान वाटतो, पक्षाच्या प्रगतीसाठी झटलेल्या प्रत्येक नेत्याला मी वंदन करतो असे पंतप्रधान मोदी म्हणाले. . आज हे वर्ष आदरणीय सुंदर सिंह भंडारी यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. अशा प्रेरणादायी माणसाला आपण सर्वजण मनापासून नमन करूया.”

पंतप्रधान मोंदी भाजपाच्या कार्यकर्त्यांना २५ वर्षांचा कानमंत्र!!

  • पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील लोकांची आशा आणि आकांक्षा आपली जबाबदारी खूप वाढवते.
  • स्वातंत्र्याच्या या अमृत काळात देश पुढील २५ वर्षांसाठी आपले लक्ष्य निश्चित करत आहे.
  • पुढील २५ वर्षांचे लक्ष्य निश्चित करण्यासाठी भाजपाकडेही वेळ आहे.
  • देशातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत.
  • देशासमोरील आव्हानांना देशातील जनतेला सोबत घेऊनच पराभूत करावे लागेल.
  • ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास’ हा आपला मंत्र आहे.

पंतप्रधान मोदी यांनी २०१४ पासूनच्या काळाला गवसणी घातली, “मित्रांनो, देशातील जनतेने २०१४ मध्ये नवा इतिहास लिहिण्याचा निर्णय घेतला. या विचारसरणीतून भाजपाने देशाला बाहेर काढले आहे. आशेचे युग, निराशेचे नाही. भारतातील प्रत्येक नागरिकाला निकाल हवा आहे. सरकारला काम करताना पाहायचे आहे. त्याचा निकाल डोळ्यासमोर पहायचा आहे. राजकीय फायदा आणि तोटा बाजूला ठेवून हा एक मोठा सकारात्मक बदल आहे असे मी मानतो. १३० कोटी लोकांच्या आकांक्षा अशाच वाढल्या तर सरकारांची जबाबदारीही वाढते.”

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “या महिन्यात केंद्रातील भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला ८ वर्षे पूर्ण होत आहेत. ही ८ वर्षे देशातील लहान शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीयांच्या अपेक्षा पूर्ण करत आहेत. देशाचा समतोल विकास, सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षा. ही ८ वर्षे देशाच्या माता-भगिनी-मुलींचा मान-सन्मान वाढवण्याचवर काम करतेय. ही आठ वर्षे संकल्पांची आणि कर्तृत्वाची आहेत. ही ८ वर्षे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी समर्पित आहेत. आम्हाला आराम करण्याची गरज नाही. आजही आपण अधीर, अस्वस्थ, आतुर आहोत कारण आपले मूळ ध्येय भारताला त्या उंचीवर नेणे हे आहे ज्याचे स्वप्न देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्यांनी पाहिले होते.”

पक्षाच्या सरचिटणीसांनी पहिल्या दिवशी अहवाल सादर केला…

  • भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राष्ट्रीय सरचिटणीसांच्या बैठकीपासून पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात झाली.
  • बैठकीपूर्वी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाचे दिग्गज नेते कुशाभाऊ ठाकरे आणि सुंदरसिंग भंडारी यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनाला भेट दिली.
  • पहिल्या दिवशीच्या बैठकीत भाजपाच्या सरचिटणीसांनी त्यांच्या प्रभाराखालील राज्यांचा सविस्तर अहवाल सादर केला.
  • त्यावर नड्डा यांनी पक्षाचे कार्यक्रम जलद पार पाडण्याच्या सूचना दिल्या.
  • या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश पक्षप्रमुख आणि संघटनात्मक सचिवांसह वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत.
  • तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत संघटनात्मक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच या वर्षी आणि पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीवरही चर्चा होणार असल्याचे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले.

Tags: BJPIndiajaipurPM Narendra modiजयपूरपंतप्रधान नरेंद्र मोदीभाजपाभारत
Previous Post

भाजपाच्या माजी आमदारावर बेहिशेबी संपत्तीचा गुन्हा! उत्पन्नापेक्षा मालमत्ता जास्त कशी? पोलीस करणार तपास!

Next Post

महागाईमुळे भाजपा माजी नगरसेविकाच भाजपाविरोधात! भजी तळले पाण्यात, गॅससाठी पाइप गटारात!!

Next Post
Jyoti Rachoya

महागाईमुळे भाजपा माजी नगरसेविकाच भाजपाविरोधात! भजी तळले पाण्यात, गॅससाठी पाइप गटारात!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!