Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महागाईमुळे भाजपा माजी नगरसेविकाच भाजपाविरोधात! भजी तळले पाण्यात, गॅससाठी पाइप गटारात!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Jyoti Rachoya

मुक्तपीठ टीम

काही वर्षांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना दिलेला भजी तळण्याचा सल्ला चांगलाच गाजला होता. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली. मात्र, भाजपा समर्थकांनी पुढे सरसावत त्यांच्या सल्ल्याचं समर्थन केलं. आता मात्र भाजपाच्याच माजी नगरसेवकानं पाण्यात भजी तळण्याचं आंदोलन केलं आहे. भाजपाच्या माजी नगरसेवक ज्योती रचोया यांनी पाण्यात भजी तळत महागाईचा मुद्दा उपस्थित केला आहे आणि केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

भाजपाने भजी तळण्याचे प्रशिक्षण शिबीर घ्यावे…

ज्योती रचोया यांनी सांगितले की, “नगरसेविका पदाचा कार्यकाळ संपल्यामुळे आता त्या मुक्त आहेत. आता त्यांना कामं नाहीत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘भजी तळा, रोजगार मिळवा’ या धोरणाने प्रभावित होऊन ते धोरण पुढे नेण्यासाठी, तेथे भजी बनवायला त्या आल्या होत्या.प्रदेश भाजपा अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी सर्व निवृत्त नगरसेवकांसाठी भजी बनवण्याचे शिबिर आयोजित करावं. भजी विकून ते सहज उपजीविका करू शकतील.”

भाजपा माजी नगरसेविकेचे भाजपालाच टोले आणि टोमणे!

ज्योती रचोया यांनी येथे भजी बनवण्यासाठी तेलाऐवजी पाणी आणि छोटा सिलिंडर आणला होता, या सिलिंडरला छिद्र पाडून त्यात एक पाईप सोडून नाल्यात सोडला होता. त्यातून त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नाल्यातून गॅस मिळवण्याच्या विधानाला टोला मानला जातो. महागाईमुळे तेल खरेदी करता येत नाही आहे. यामुळे पाण्यात पकोडे तळतही त्यांनी खाद्यतेल महागाईवर स्वत:च्याच सरकारला टोमणा मारला. तर गॅस सिलिंडर एक हजार रुपयांचा झाला असून सिलिंडरवरील सबसिडीही बंद झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे बायोगॅस वापरण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांना नाल्यातून बायोगॅस मिळाला नाही. यासाठी त्यांनी सिलिंडरच्या आत लाकूड जाळून पकोडे बनवण्याचीही तयारी केली.

प्रकृती खालावल्याने रुग्णालयात!

  • प्रदेश भाजपा कार्यालयासमोर सुमारे दीड तासानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
  • प्रदेश भाजपाच्या तक्रारीवरून पोलीस पक्ष कार्यालयाबाहेर आले आणि पोलिसांनी सामान हटवले.
  • याआधीही अनेकवेळा ज्योती यांनी प्रदेश भाजपा अध्यक्ष आदेश गुप्ता यांच्याविरोधात पत्र लिहिली आहेत, असे सांगितले जाते.
  • त्यामुळे आंदोलनामागे त्यांचा उद्देश गुप्तांविरोधातील असंतोष उघड करणे हाही असल्याचे मानले जाते.

Tags: BJPBJP CouncilorJyoti Rachhoyanallah gas agitationpakodaज्योती रचोयाभजीभाजपा
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन: “भाजपानं ठरवावं २५ वर्षांचं लक्ष्य!”

Next Post

राज्यात ३११ नवे रुग्ण, २७० बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात ३११ नवे रुग्ण, २७० बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!