मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी संध्याकाळी पाच वाजता वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हँडलने ट्वीटद्वारे याची माहिती दिली आहे. कोरोना संकट आल्यापासून पंतप्रधानांनी आजवर नऊवेळा देशाला संबोधित केले आहे.
मोदीचा संदेशात काय असण्याची शक्यता?
- पंतप्रधान नरेंद् मोदी लसीकरणाविषयी मोठी घोषणा करु शकतात. युवा लसीकरणाची त्यांनी घोषणा केली मात्र महिना उलटल्यानंतरही त्यात प्रगती झालेली नाही. राज्यांना लस पुरवण्यास अनेक कंपन्या तयार नाहीत. त्यामुळे केंद्र सरकार ४५ वरील वयोगटाप्रमाणे ती जबाबदारीही स्वत:कडे घेण्याची अपेक्षा आहे.
- राज्याने कंपन्यांऐवजी केंद्राला पैसा द्यावा आणि केंद्राने लसपुरवठा करावा, असे धोरण जाहीर होण्याची शक्यताय. पैसा राज्यांचा, पुरवठा केंद्राचा असे समीकरण ठरू शकते.
- दुसरी लाट ओसरत असली तरी तिसरी लाट टाळण्यासाठी करण्याचे प्रयत्न आणि लसीकरणाचा आग्रह ते धरु शकतात.
- कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागलेली असताना काही देशव्यापी नियमांविषयी बोलण्याची शक्यता आहे.
- पंतप्रधान अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी मोठी घोषणा करु शकतात
पंतप्रधानांचा कोरोना संकटात याआधी आठवेळा देशाला संदेश
१. १९ मार्च २०२० जनता संचारबंदीचे आवाहन
२. २४ मार्च २०२० २१ दिवसांचा लॉकडाऊनची घोषणा
३. ३ एप्रिल २०२० – आरोग्य रक्षकांसाठी दिवे लावण्याचे आवाहन
४. १४ एप्रिल २०२० – ३ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा
५. १२ मे २०२० – २० लाखांचे
६. ३० जून २०२० – अन्न पुरवठा योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची घोषणा
७. २० ऑक्टोबर २०२० – कोरोनाला थोपवल्याची घोषणा. त्यानंतर देशातील निर्बंध हटवण्यात आले.
८. २० एप्रिल २०२१ – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बचावासाठी सूचना. पण लॉकडाऊनची घोषणा नाही. उलट मोहल्ला समित्या बनवत जनजागरणाच्या माध्यमातून नियम पालत लॉकडाऊन टाळण्यासाठी प्रयत्नांचे आवाहन.
९. आज कोरोना संकटाच्या पंधरा महिन्यातील नववा संदेश. आज जर काही महत्वाचे बोलले तर ती घोषणा सरसकट लसीकरणाची असावी, अशीच अपेक्षा आहे.