मुक्तपीठ टीम
मुंबईतील प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात राडा झाल्यानंतर आमदार सदा सरवणकर यांचं पिस्तुल जप्त करण्यात आलं आहे. गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या राड्यावेळी सदा सरवण यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. या आरोपांनंतर दादर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आता सरवणकर यांच्या जवळील पिस्तुल जप्त केले आहे.
सदा सरवणकरांच्या अडचणीत वाढ!!
- प्रभादेवीत गणेश विसर्जन मिरवणुकीत राड्यात सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी केला होता.
- या गोळीबारात एक पोलीस जखमी होता होता वाचल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
- त्यानंतर सदा सरवणकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेकडून केली जात होती.
- यानंतर पोलिसांनी रविवारी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
- तसेच, घटनास्थळावरुन पोलिसांकडून गोळीही जप्त करण्यात आली होती.
नेमका वाद काय?
- गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला होता.
- प्रभादेवी या ठिकाणी गणेश विसर्जनावेळी शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते.
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आदेश दिल्यानंतर संघर्ष टळला होता.
- परंतु शनिवारी हा वाद पुन्हा उफाळून आला.
- यात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांना पिस्तूलचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता.