Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रात जिथं पाहिजे तिथं छायाचित्रकार, फोटोग्राफी क्षेत्रासाठी ‘फोटोस्टॅट ॲप’ लाँच!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Photostat App

मुक्तपीठ टीम

आजच्या धावपळीच्या युगामध्ये सर्वांना प्रत्येक सेवा तत्काळ हवी असते. हीच गोष्ट लक्षात घेऊन पुण्यामध्ये फोटोग्राफी क्षेत्रासाठी ‘फोटोस्टॅट ॲप’ लाँच करण्यात आले. या ॲपमुळे राज्यातील अनेक फोटोग्राफर्स एकमेकांशी जोडले जातील. तसेच ग्राहकांना घरबसल्या या ॲपमधून फोटोग्राफर बुक करता येणार आहे. बूकिंग केल्यानंतर अगदी १५-२० मिनीटांमध्ये फोटोग्राफर निश्चित ठिकाणी पोहोचेल. विशेषतः फोटो काढल्याबरोबरच तिथेच ग्राहकांना लगेचच फोटोची प्रतही देण्यात येणार असल्याची माहिती फोटोस्टॅटचे सचिन अवसरमल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सुप्रसिद्ध फोटोग्राफर योगेंद्र चव्हाण, सचिन भोर, प्रियदर्शनी भोर, रंजन झिंगाडे, जयनंदनी मुथू उपस्थित होत्या.

 

फोटोस्टॅट ॲपमध्ये कस्टमर कॅटगरीमधून फोटोशूट कोणत्या प्रकारचा आहे ते ग्राहक निवडू शकतात. उदा. पासपोर्ट साइज़, शॉर्ट टाईम फोटोशूट, हाफ डे फोटोशूट, फुल डे फोटोशूट या व्यतिरिक्त प्री वेडिंग शूट, वेडिंग शूट, मॉडेल फोटोग्राफी, फॅशन फोटोग्राफी, इंव्हेंट फोटोग्राफी, कर्शियल फोटोग्राफी, पेट, फोटोग्राफी, ड्रोन फोटोग्राफी, मॅटरनिटी फोटोग्राफी इ. अनेक प्रकारच्या सोयी या ॲपद्वारे ग्राहकांना घेता येतील. हे ॲप फोटोग्राफर्सना चांगली संधी आहे. ईच्छुक फोटोग्राफर्सना फोटोस्ट्याट सोबत काम करायचे असेल तर त्यांनी रितसर नोंदणी करणे आवश्यक आहे.

 

सचिन अवसरमल म्हणाले की, “फोटोग्राफर्सने आमच्याकडे नोंदणी करताच ते आमच्याशी जोडले जातील. या अ‍ॅपच्या आधारे फोटोग्राफर्स ऑनलाइन ऑर्डर घेवू शकतील. फोटोग्राफर ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणच्या १० किमी परिसरातील ऑर्डर त्यांना स्वीकारता येतील. ज्यावेळी फोटोग्राफरना काम करायची ईच्छा नसेल त्यावेळी तेंव्हा ते त्यांचे प्रोफाईल ऑफलाईन मोड वरती टाकू शकतो. इतकं सहज हे ॲप फोटोग्राफर व ग्राहक यांना वापरता येण्यासारखं आहे.


Tags: good newsMaharashtramuktpeethPhotographerPhotography AreaPhotostat Apppuneचांगली बातमीछायाचित्रकारपुणेफोटोग्राफी क्षेत्रफोटोस्टॅट ॲपमहाराष्ट्रमुक्तपीठ
Previous Post

राज्यात ९७ नवे रुग्ण, २५१ रुग्ण बरे! विदर्भात एकही नवा रुग्ण नाही!

Next Post

दोन मित्रांची जिद्द भरारी! ट्विटर आणि मायक्रोसॉफ्टची सोडली नोकरी, 3D व्हर्च्युअल लर्निंग प्लॅटफॉर्मची तयारी!

Next Post
3D Virtual Learning Platform

दोन मित्रांची जिद्द भरारी! ट्विटर आणि मायक्रोसॉफ्टची सोडली नोकरी, 3D व्हर्च्युअल लर्निंग प्लॅटफॉर्मची तयारी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!