Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपाचं मिशन २०२४: देशभरातील लाखो कमकुवत बूथचा शोध, बुथ मागे ३० सदस्यांचं लक्ष्य!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
BJP Mission 2024

मुक्तपीठ टीम

भारतीय जनता पार्टीनं २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारी आतापासून सुरु केलीआहे. भाजपा गेली अनेक वर्षे बुथवर भर देत मतदारांशी थेट संपर्कात येत असते. त्या रणनीतीनुसारच आधीच्या निवडणुकांमध्ये ज्या बुथांवर भाजपाला कमी मतदान झाले ते बुथ कमजोर म्हणून त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. अशा बुथांवर एका बुथमागे ३० कार्यकर्ते जोडण्याचं लक्ष्य ठरवण्यात आलं आहे. त्यातून आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा देशात सत्ता आणायची रणनीती ठरवण्यात आली आहे.

बुथ जिंका, देश जिंका!

  • भाजपा प्रत्येक निवडणुकीचं नियोजन हे अगदी तळागाळातून मायक्रो मॅनेजमेंटने करते.
  • त्यासाठी भाजपाचे पाचही वर्ष काम सुरु असतं.
  • निवडणुका घोषित झाल्यावर किंवा जवळ आल्यावर जाग्या होणाऱ्या इतर पक्षांच्या तुलनेत भाजपा आधीच काम सुरु करते.
  • यावेळीही २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच भाजपाने तयारी सुरु केली आहे.
  • देशातील सर्वात मोठे राज्य असणाऱ्या उत्तरप्रदेशातून कमकुवत बूथ सक्षमीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
  • भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नुकतीच पक्षाच्या मुख्यालयात सरचिटणीसांची बैठक घेतली.
  • या बैठकीत बूथ मजबूत करण्यावर भर देण्यात आला.

कमकुवत बुथ मजबुत कसे करणार?

  • या वर्षी मे महिन्यात भाजपाने उत्तरप्रदेशात पक्षासाठी ७८ हजार कमकुवत बूथ ओळखले होते.
  • या प्रत्येक बुथवर किमान ३० नवीन सदस्यांना पक्षाशी जोडण्याचा निर्णयही घेण्यात आला.
  • या कामासाठी केंद्रीय मंत्री तसेच लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांची टीमही सहभागी झाली आहे.
  • खासदारांना प्रत्येकी १०० बूथ आणि आमदारांना २५ बूथ देण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या वाट्याला राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
  • भाजपच्या या कार्यक्रमाचा पहिला टप्पा ३१ ऑगस्टला संपला.

कशा पद्धतीने राबवली जाणार बुथ सक्षमीकरण मोहीम?

  • खासदारांनी तैनात केलेल्या स्वयंसेवकांच्या गटाने सर्व बूथना भेट देऊन मतदारांशी संवाद साधला.
  • त्यानंतर ‘सरल’ या खास सॉफ्टवेअरवर त्यांनी आपला अहवाल अपलोड केला.
  • त्यानंतर हा डेटा राज्यापासून केंद्रीय स्तरावर डिजिटल पद्धतीने अपडेट केला जातो.
  • सर्व राज्यांच्या बुथ डेटाचे विश्लेषण केले जाईल. त्याच्या अभ्यासानंतर त्या राज्याच्या परिस्थितीनुसार रणनीती ठरवली जाईल.

Tags: BJPBJP Mission 2024BJP National President JP NaddamuktpeethUnion Home Minister Amit ShahWeak Boothकमकुवत बूथकेंद्रीय गृहमंत्री अमित शहाघडलं-बिघडलंभाजपाभाजपा मिशन २०२४भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डामुक्तपीठ
Previous Post

नासाचे मिशन आर्टेमिस-1 प्रक्षेपणासाठी सज्ज! पुन्हा चंद्रावर मानव!!

Next Post

कोरोना लस वाद : सीरम इंस्टिट्यूटकडून १००० कोटी नुकसानभरपाईची मागणी, उच्च न्यायालयाची नोटीस!

Next Post
Mumbai High Court And Covishield

कोरोना लस वाद : सीरम इंस्टिट्यूटकडून १००० कोटी नुकसानभरपाईची मागणी, उच्च न्यायालयाची नोटीस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!