मुक्तपीठ टीम
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट (SII) द्वारे निर्मित लस कोविशील्डमुळे महाराष्ट्रातील एका व्यक्तीने आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे. त्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीरम इन्स्टिट्यूटसह इतरांकडून जबाब मागवला आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्याने मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स, केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांना मुख्य प्रतिवादी बनवले आहे. याचिकाकर्त्याने मुलीच्या मृत्यूसाठी अँटी-कोरोनाव्हायरस लस कोविशील्डला जबाबदार धरत १००० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
मुलीच्या मृत्यूसाठी कोरोना लस जबाबदार असल्याचा आरोप!
- दिलीप लुणावत यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि इतरांकडून उत्तर मागितले आहे.
- ज्यामध्ये त्यांनी कोविशील्ड व्हॅक्सिनला त्यांच्या मुलीच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवले आहे.
- लस कंपनीकडून १००० कोटी रुपये भरपाईची मागणी केली आहे.
- याचिकाकर्ते दिलीप लुणावत यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स, केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांनाही मुख्य लक्ष्य ठरवल आहे.
- गेट्स फाउंडेशनने SII कंपनीसोबत भागीदारी केली होती.
नेमकं प्रकरण काय?
- स्नेहल लुणावत ही वैद्यकीय विद्यार्थिनी होती
- ती आरोग्य सेविका असल्याने तिला २८ जानेवारी २०२१ रोजी नाशिकमधील तिच्या महाविद्यालयात SII ने तयार केलेली कोरोना लस कोविशील्ड देण्यास आली होती.
- कोविशील्ड लस घेतल्यानंतर काही दिवसांनी स्नेहलला तीव्र डोकेदुखी आणि उलट्या होऊ लागल्या आणि तिला रुग्णालयात नेण्यात आले.
- तेथे डॉक्टरांनी स्पष्ट केले की, त्याच्या मेंदूमध्ये गुठळ्या झाल्याचा त्रास होत आहे.
- स्नेहलचा १ मार्च २०२१ रोजी मृत्यू झाला.
- मृत्यूचे कारण लसीचा दुष्परिणाम असल्याचा दावा करण्यात आला आहे.
- २६ ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती एसव्ही गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने याचिकेवर सर्व प्रतिवादींना नोटिसा बजावल्या.
- १७ नोव्हेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.