Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी कोट्यवधी आले तरी कुठून? न्यायालयात याचिका

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
BKC

मुक्तपीठ टीम

बुधवारी मुंबईतील बीकेसी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिंदे गटाने शेकडो एसटी बसेस बुकींग केलेल्या तसेच या मेळाव्यासाठी जमलेल्या नागरिकांच्या खानपानासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला. नोंदणीकृत पक्ष नसतानाही या गटाने खर्च केलेल्या पैशांचा स्त्रोत काय? हे पैसे आले कुठून आणले ? त्यांना ते कोणी उपलब्ध केले ? याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच शिंदे गटाच्या या खर्चाकडे प्राप्तिकर विभाग व अन्य यंत्रणांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केली, याचीही चौकशी करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

दीपक जगदेव यांनी केली याचिका दाखल!!

  • दीपक जगदेव यांनी अॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली असून १४ ऑक्टोबरला या याचिकेवर प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यात सीबीआय किंवा मुंबई पोलिसांचा आर्थिक गुन्हे विभाग किंवा अंमलबजावणी संचालनालयासारख्या (ईडी) केंद्रीय यंत्रणांना या निधीच्या चौकशीचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
  • राज्याच्या विविध भागातून शिंदे समर्थकांना वांद्रे-कुर्ला संकुलापर्यंत आणण्यासाठी एसटीच्या १८०० बसगाड्या आरक्षित करण्यात आल्या होत्या.
  • परिणामी ग्रामीण भागांतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.
  • याचीही चौकशी करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.

याचिकेत काय नमूद केले?

  • मेळाव्यासाठी समर्थकांना मुंबईत आणण्यासाठी अद्याप पूर्ण न झालेल्या मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाचा वापर वाहतूक नियमांचे उल्लंघन करून आणि परिवहन विभागाची परवानगी न घेता करण्यात आल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.
  • बीकेसीतील मेळाव्यासाठी एमएमआरडीए मैदान भाड्याने घेणे, मेळाव्याआधी दोन हजारांवर फलके लावणे, मेळाव्याची पूर्वप्रसिद्धी करणे, मेळाव्यादरम्यान प्रसिद्ध गायकांचा गाण्यांचा सादर करणे, मुंबईत आलेल्या समर्थकांसाठी खाद्यपदार्थांची पाकिटे उपलब्ध करणे तसेच मेळाव्याबाबत वृत्तपत्रांमधील जाहिरातींवर मोठ्या प्रमाणात खर्च करणे आदीसाठी एवढा पैसा कुठून आला, असा प्रश्न याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे.
  • शिंदे गटाने १० कोटी रुपये एसटी महामंडळाला १८०० बसगाड्या आरक्षित करण्यासाठी दिल्याचे वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे, असेही याचिकेत नमूद केले आहे.

Tags: Dasara MelavaDeepak Jagdevmumbaimumbai high courtShinde Campदसरा मेळावादीपक जगदेवमुंबईशिंदे गट
Previous Post

रिझर्व्ह बँक डिजिटल रुपयाच्या तयारीत! मांडली ‘ई-रुपी’ची संकल्पना…

Next Post

धर्मांतरानंतर SC दर्जाचं काय? माजी सरन्यायाधीशांची समिती करणार विचार

Next Post
commission-will-consider-sc-status-to-those-who-change-religion

धर्मांतरानंतर SC दर्जाचं काय? माजी सरन्यायाधीशांची समिती करणार विचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!