Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

न्यायाधीशांनी ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्याला खडसावलं! कारण ड्रेस कोड!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Patna High Court

मुक्तपीठ टीम

न्यायालय म्हटलं की प्रत्येकाला एक भीती वाटतेच वाटते. त्याचं कारण न्यायालयात पाळले जाणारे नियम फारच वेगळे असतात. त्याची माहिती नसेल तर खडसावलंही जातं. तेही चारचौघात. बहुधा त्यामुळेच शहाण्यानं न्यायालयाची पायरी चढू नये, असं म्हणतात. आता ताजं उदाहरण एका ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांचं आहे. ते शर्ट-ट्राऊझरमध्ये पाटणा उच्च न्यायालयात गेले. तेथे ते बोलण्यापूर्वीच न्यायाधीशांनी त्यांना ड्रेस कोडवरून खडसावलं.

सध्या सोशल मिडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ड्रेस कोडसाठी ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना जाब विचारताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाटणा उच्च न्यायालयाचा असल्याचं कळतं.

राष्ट्रीय माध्यमांमधील बातम्यांनुसार, ही घटना न्यायाधीश पीबी बजंथारी यांच्या न्यायालयातील आहे. हा सर्व प्रकार न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच घडला. आयएएस अधिकारी बोलायला उभे राहिले. ते बोलत असताना, न्यायाधीश पीबी बजंथरी यांनी त्यांना थांबवले आणि त्याच्या ड्रेस कोडवर प्रश्न उपस्थित केला.

न्यायाधीशांनी आयएएस अधिकाऱ्याला काय खडसावलं?

  • न्यायमूर्ती म्हणाले की कोणत्या ड्रेसमध्ये कोर्टात हजर राहायचे हे माहित नाही का?
  • किमान कोट आणि कॉलर तरी उघडी नसावी.
  • न्यायाधीश एवढेच बोलून थांबले नाही तर त्यांनी वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याला जाब विचारत खडसावले की, तुम्ही मसुरी येथील सिव्हिल सर्व्हिसेस ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये भाग घेतला नाही का?
  • तुम्हाला कोर्ट म्हणजे काय सिनेमा हॉल वाटतो का?

न्यायमूर्ती इतकं बोलताच न्यायालयात शांतता पसरली. न्यायाधीशांच्या प्रश्नावर आयएएस अधिकारी आनंद किशोर स्पष्टीकरण देत होते, परंतु न्यायाधीशांनी त्यांचे ऐकून घेतलं नाही. ते फक्त सुनावत होते.


Tags: Dress CodeIAS Officer Anand KishorPatna Hih CourtSenior IAS Officerआयएएस अधिकारी आनंद किशोरज्येष्ठ आयएएस अधिकारीड्रेस कोडपाटणा उच्च न्यायालय
Previous Post

राहुल गांधींमागे ईडीपिडा: काँग्रेसची पुष्पा स्टाइल…”झुकणार नाही!”

Next Post

रॉबर्ट वाड्रांनी वाढवली राहुल गांधींची हिंमत, “मलाही ईडीचे १५ समन्स…”

Next Post
robert vadras emotional post before rahul gandhis ed interrogation

रॉबर्ट वाड्रांनी वाढवली राहुल गांधींची हिंमत, "मलाही ईडीचे १५ समन्स..."

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!