मुक्तपीठ टीम
बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आयुर्वेद लिमिटेडने त्यांची सहकारी कंपनी रुची सोया या कंपनीचे एफपीओ बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. एवढेच नव्हे तर पतंजली एफएमसीजी क्षेत्रातील हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडसारख्या कंपन्यांना मागे टाकण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आम्ही एचयूएल वगळता सर्व कंपन्यांना मागे सोडलं आहे. सध्या एचयूएल ही आमच्यापेक्षा मोठी कंपनी आहे. पतंजलीच्या वाढत्या व्यवसायाबद्दल बाबा रामदेवांनी माहिती दिली आहे. २०२५ पर्यंत एचयूएललासुद्धा मागे टाकण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे कंपनीच्या योजनांवर बाबा रामदेव यांनी सांगितले.
पतंजली मोठ्या प्रमाणावर रोजगार देणार-
- बाबा रामदेव यांनी सांगितले की, पतंजलीने ५ वर्षांत ५ लाखांहून अधिक लोकांना रोजगार दिला आहे.
- येत्या ५ वर्षांत ५ लाख रोजगार देणार आहे.
- २ लोकांच्या सहकार्याने सुरुवात केल्यानंतर २०० देशांमध्ये योगासने पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.
- आम्ही १०० पेक्षा जास्त औषधे तयार केलीत.
- एवढेच नाही तर आम्ही रुची सोयाचा व्यवसाय वाढवून १६,३१८ कोटी रुपये केला आहे.
- आम्ही रुची सोयाला २४.४ टक्केच्या दराने पुढे घेऊन जात आहोत.
- पुढे कंपनीचे संपूर्ण संशोधन हे आरोग्य, शिक्षण आणि शेतीवर असेल.
- २०२०-२१ या आर्थिक वर्षात पतंजलीची उलाढाल सुमारे ३० हजार कोटी रुपये होती.
४३०० कोटींचा एफपीओ आणणार-
- पतंजलीच्या क्षमतेचा सातत्याने विस्तार सुरू आहे.
- आता आम्ही पौष्टिक उत्पादनांवर लक्ष केंद्रीत करीत आहोत.
- महिलांच्या आरोग्य सेवांवरही आता जोर दिला जात आहे.
- आता आम्ही रुची सोयाला एफएमसीजी कंपनी बनवू.
- आम्ही रुची सोया यांसारख्या कंपनीला टर्नअराऊंड केले आहे.
- आम्ही ४,३०० कोटी रुपयांचा एफपीओ घेऊन येत आहोत.
- तसेच आम्ही पतंजलीच्या आयपीओची बातमी लवकरच आपल्याला देणार असल्याचे सांगितले.
- पतंजली समूहाचे पुढील तीन-चार वर्षांत कंपन्यांना कर्जमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे.