मुक्तपीठ टीम
योगगुरू बाबा रामदेव यांनी नेपाळमध्ये पतंजली समूहाच्या २ टीव्ही वाहिन्या सुरू केल्या आहेत. बाबा रामदेव काठमांडूमध्ये या चॅनेल्सच्या लॉन्चिंग आणि इतर व्यावसायिक प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी गेले आहेत. बाबा रामदेव ३ दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर असून त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण हेही त्यांच्यासोबत आहेत.
नेपाळमध्ये चॅनेल्स सुरु.
- बाबा रामदेव शुक्रवारी आस्था नेपाळ टीव्ही आणि पतंजली नेपाळ टीव्ही लॉन्च केले.
- पतंजलीच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या पतंजली सेवा सदन व्यतिरिक्त स्वदेशी समृद्धी कार्डचे उद्घाटनही योगगुरू केले.
- बाबा रामदेव पश्चिम नेपाळमधील स्यांगजा येथेही पतंजली आयुर्वेद समूहाद्वारे विकसित करण्यात येत असलेल्या प्रकल्पाची पाहणी केली.
पतंजलीच्या कोरोनिल किटवर नेपाळमध्ये बंदी
- जूनमध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत, नेपाळने बाबा रामदेव यांच्या कंपनी पतंजलीच्या कोरोनिल किटवर बंदी घातली होती.
- त्यानंतर नेपाळच्या आरोग्य विभागाने नेपाळ सरकारच्या नियमांनुसार विभागाकडे कोरोनिल किटची नोंदणी होईपर्यंत ही बंदी असेल असे सांगितले होते.
- नेपाळमधील पतंजली योगपीठाने भारताकडून कोरोनिलचे किट खरेदी केले होते.
- त्यामुळे बाबा रामदेव यांचा प्रयत्न नेपाळमधील राजकीय सामाजिक वर्तुळात प्रभाव वाढवण्याचा असल्याचे कळते. त्यातून पतंजलीला नेपाळ या हिंदू बहुसंख्येच्या राष्ट्रात विस्तारासाठी अधिक वाव मिळू शकेल, अशी त्यांची अपेक्षा आहे.
पतंजली ईशान्येत पाम तेलाचे उत्पादन वाढवणार
- बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहाचे नेतृत्व असणारी कंपनी रुची सोया आसाम, त्रिपुरा आणि इतर ईशान्येकडील राज्यांमध्ये पाम तेल लागवड सुरू करण्याची योजना आखत आहे.
- खाद्यतेल प्रक्रिया करणाऱ्या रुची सोया कंपनीला पतंजली समूहाने २ वर्षांपूर्वी विकत घेतली होती.
- त्यावेळी कंपनी तोट्यात होती.
- पतंजली समूहाने यापूर्वी पाम लागवडीसाठी क्षेत्र सर्वेक्षण केले आहे.
- शेतकऱ्यांशी करार करून ही लागवड केली जाणार आहे.
- त्या राज्यांमध्ये स्थापित असलेल्या रुची सोयाच्या प्रक्रिया प्रकल्पांद्वारे ऑइल पामच्या खरेदीची हमी दिली जाईल.