Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

परभणीत कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

January 9, 2021
in घडलं-बिघडलं
0
parbhani

परभणी तालुक्यातील मुरुंबा येथील कुकुट पालन करणार्‍या शेतकर्‍यांवर मोठे संकट कोसळले आहे. मागील दोन ते तीन दिवसापासून मुरुंबा शिवारातील कुकूटपालन करणाऱ्या, शेतकऱ्यांनी पाळलेल्या कोंबड्या मरून पडत आहेत. तेथील विजयकुमार सखाराम झाडे यांच्या कुक्कुटगृहात ७ जानेवारी रोजी ३३६, तर ८ जानेवारी रोजी ४६४ कोंबड्या अचानक मरण पावल्या. परंतु या घडलेल्या घटनेमुळे, गाव आणि परिसरामध्ये बर्ड फ्लू पसरला असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी काळजी घ्यावी, परंतु अहवाल आल्याशिवाय बर्ड फ्लू समजू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

गेल्यावर्षी २४ ऑक्टोबरला विजयकुमार सखाराम झाडे यांनी ८०० कोंबड्या हिंगोली जिल्ह्यातून खरेदी केले होते. या पक्ष्यांना लासोटा, मानमोडी, आयबीडी, मरेक्स या रोगाची लस देण्यात आली होती. कावेरी या जातीच्या असलेल्या कोंबड्या अंदाजे दिड ते दोन किलो ग्रॉम वजनाच्या असून त्यांचे वय साडे तीन महिने होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर परभणी येथील पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. मृत पक्ष्यांचे नमुने पुणे येथील अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी या अनुषंगाने शुक्रवारी एक आदेश काढला आहे. त्यात कोंबड्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट नसल्याने अज्ञात रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी मुरुंबा येथे सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत या गावातील कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्री, वाहतूक, बाजार आणि जत्रा प्रदर्शन अवागमनास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. मुरुंबा गाव शिवारातील ५ किमी परिसरात हा आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच मुंरुबा हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. परंतु या घडलेल्या घटनेमुळे गावकऱ्यांनी काळजी घ्यावी, परंतु अहवाल आल्याशिवाय बर्ड फ्लू समजू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 


Tags: hens DeathmurumbaparbhaniPoultry farmingपरभणी
Previous Post

मराठा आरक्षणातील संवैधानिक बाबींवर केंद्राने सकारात्मक बाजू मांडावी; अशोक चव्हाण यांची मागणी

Next Post

घोडाझरी शाखा कालव्याच्या कामाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

Next Post
मा.मुख्यमंत्री घोडाझरी कालवाला भेट देण्यासाठी

घोडाझरी शाखा कालव्याच्या कामाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!