मुक्तपीठ टीम
वडिल हनुमंत सकाटे पुण्यातील रस्त्यांवर आलेपाक विकतात. रोजचे जेमतेम शंभर दोनशे रुपये मिळतात. पारसला गालगुंडाचा आजार. पण गंभीरपणे पसरलेल्यानं काही गिळताही न येणारा. पुण्यातील डॉ. अशोक घोणेंच्या माध्यमातून त्याचं एम रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया झाली आणि तो चिमुरडा समस्यामुक्त झाला. पुण्यातील डॉ. अशोक घोणे गेली आणि सहकारी गरजूंवर मोफत उपचार करतात. त्यांच्या वेळीच मदतीमुळे पारस सकाटे या चिमुरड्याची गंभीर समस्येतूुन मुक्तता झाली.
पारसच्या शस्त्रक्रियेसाठी डॉ. घोणे यांनी सगळीकडे प्रयत्न केले. एम एम फाऊंडेशन, चाइल्ड फाउंडेशन या सामाजिक संस्था पुढे सरसावल्या. डॉ. घोणे सांगतात. बाळासाठी विविध संस्थांनी आम्हाला मदत केली. ते सर्व देणगीदार आणि विविध सामाजिक संस्थांचे आम्ही खूप ऋणी आहोत. सर्वांना खूप खूप धन्यवाद!
डॉ अशोक घोणे यांचे आवाहन
पारससाठीच डॉ. घोणे यांनी प्रयत्न केलेत असं नाही. गेली २७ वर्षे ते सातत्यानं अशा मुलांसाठी, गरजूंवर योग्य आरोग्य उपचारांसाठी धडपडत असतात. त्यांच्या या वैद्यकीय सेवेमुळेच पारसचे पालकही त्यांच्यापर्यंत पोहचू शकले. त्यांच्या प्रयत्नांनी गरजूंवर वर्षभर पुढील वैद्यकीय उपचार केले जातात. आरोग्य सेवा पुरवल्या जातात.
- मोफत अँजिओग्राफी 3000/-केवळ
- मोफत अँजिओप्लास्टी.
- तसेच इतर सर्व आजाराच्या शस्त्रक्रिया आपल्याला अगदी माफक दरांमध्ये मध्ये करून मिळेल.
तुमच्या गरीब आणि गरजूं रुग्णांसाठी उत्तम आरोग्य सेवा मिळू शकेल. कृपया गरजू रुग्णांना पाठवा. अर्थात त्यासाठी काही अटी आहेत. त्या निकषांवर उतरणाऱ्या रुग्णांसाठीच माफक दरातील किंवा मोफत अधिक माहितीसाठी त्यांच्या समन्वयकाला फोन करा, असं त्यांनी आवाहन केले आहे.
+919822087919 (24×7×365)
पाहा व्हिडीओ: