मुक्तपीठ टीम
मुंबई लोकल ट्रेनच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता दररोज लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास रेल्वे विभागाने सोपा केला आहे. आता गोरेगाव ते पनवेल आणि गोरेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस थेट गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.
लोकलच्या दिवसभरात १८ फेऱ्या
- हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेने बुधवार १ डिसेंबरपासून प्रथमच गोरेगाव ते पनवेल अशी लोकल सेवा सुरु केली आहे.
- हार्बरवर सध्या पनवेल ते अंधेरीपर्यंत लोकल आहे.
- आता त्याचा विस्तार करुन ती गोरेगावपर्यंत नेण्यात येणार आहे.
- या लोकलच्या दिवसभरात १८ फेऱ्या होणार आहेत.
- मध्य रेल्वेच्या हार्बर, ट्रान्सहार्बर, बेलापूर-नेरुळ-खारकोपर मार्गाचे सुधारित वेळापत्रक लागू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिलीये.
प्रवाशांची मागणी लक्षात घेता गोरेगावपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय
- कांदिवली, मालाड, जोगेश्वरी, राम मंदिर आणि गोरेगाव स्थानकांतून हार्बरसाठी मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात.
- मात्र, या मार्गावर फक्त अंधेरीपर्यंतच लोकल धावायची.
- तसेच, गोरेगाव ते पनवेल लोकल नसल्याने वसई, विरार, बोरिवली ते मालाड, गोरेगावपर्यंतच्या प्रवाशांना अंधेरी स्थानक गाठावे लागत होते.
- त्यामुळे प्रवाशांची मागणी लक्षात घेता अंधेरीपर्यंत असलेल्या हार्बरचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
- त्यासाठी २००९ मध्ये मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून एमयूटीपी २ अंतर्गत विस्ताराचे काम हाती घेण्यात आले होते.