Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लखीमपूरमधील शेतकरी हत्याकांडामुळे भाजपाच्या गोटात घबराट!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
BJP

मुक्तपीठ टीम

उत्तरप्रदेशातील लखीमपूरमधील शेतकरी हत्याकांडामुळे भाजपाच्या गोटात घबराट पसरली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांचा मुलगा आरोपी असलेल्या प्रकरणामुळे भाजपासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. उत्तर प्रदेशाच्या तराई भागातील या जिल्ह्यात भाजपाने २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत सर्व ८ जागा जिंकल्या होत्या. २०१२ च्या तुलनेत हे एक मोठे यश होते, जेव्हा पक्षाला फक्त एकच जागा मिळाली होती. या जिल्ह्यात बहुसंख्या शेतकरी मतदार आहेत. मंत्रीपुत्राच्या गाडीखाली शेतकरी चिरडले गेल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांची मनं आणि मतं फिरल्यास फटका बसण्याची भीती भाजपाला सतावत आहे.

  • तराई भागात बहुसंख्य मतदार हे शेतकरी आहेत.
  • पिकांचे भाव आणि शेतकऱ्यांशी संबंधित इतर मुद्दे येथे नेहमीच महत्त्वाचे राहिले आहेत.
  • फाळणीनंतर या भागात स्थायिक झालेले शीख शेतकरीही मोठ्या संख्येने आहेत.
  • त्यामुळे या हिंसेमुळे भाजपला लखीमपूर खेरीसह मोठ्या भागात नुकसान होण्याची भीती आहे.
  • या घटनेचा परिणाम पीलीभीत, शाहजहाँपूर, हरदोई, सीतापूर आणि लखीमपूर खेरीला लागून असलेल्या बहराइचमध्येही दिसू शकतो.
  • या सर्व जिल्ह्यांमध्ये भाजपाने २०१७ च्या निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती.
  • या ६ जिल्ह्यांमधील ४२ पैकी ३७ विधानसभा जागा भाजपाने जिंकल्या होत्या.

 

प्रमुख विरोधीपक्ष सपाला बसला होता फटका

  • ४०३ जागा असणारी उत्तरप्रदेश विधानसभेत या जिल्ह्यांचे महत्त्व खूप जास्त आहे.
  • येथे लाभलेले पक्ष अनेकदा सत्तेचा मार्ग स्वीकारत आले आहेत.
  • २०१२ मध्ये सपाने येथून २५ जागा जिंकल्या होत्या आणि सत्ताही मिळवली होती.
  • यानंतर २०१७ मध्येही हाच ट्रेंड दिसून आला.
  • काँग्रेससोबत निवडणूक लढवणाऱ्या सपाला केवळ ४ जागा मिळू शकल्याने पक्षाचे हे मोठे यश होते.
  • याशिवाय, बसपाला एक जागा मिळाली आणि काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती.
  • या घटनेमुळे गेल्या निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती होऊ शकणार नाही, अशी भीती भाजपला आहे.

Tags: BJPCongressfarmerslakhimpurअजय मिश्राकाँग्रेसभाजपालखीमपूरशेतकरीशेतकरी हत्याकांड
Previous Post

महत्वाकांक्षी नमामि गंगे योजनेत औरंगाबादच्या खाम नदीचाही कायापालट होणार!

Next Post

व्हरांड्यात झोपलेल्या तरूणावर हल्लेखोरांनी हल्ला करत गुप्तांग कापून नेले!

Next Post
police

व्हरांड्यात झोपलेल्या तरूणावर हल्लेखोरांनी हल्ला करत गुप्तांग कापून नेले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!