Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महत्वाकांक्षी नमामि गंगे योजनेत औरंगाबादच्या खाम नदीचाही कायापालट होणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
kham river aurangabad

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी नमामि गंगे योजनेमध्ये औरंगाबादच्या खाम नदीचा समावेश करण्यात आला आहे. केंद्राकडून मिळणाऱ्या निधीतून नदीचे पुनरुज्जीवन करणे आणि नदीकाठच्या लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणे, असे या योजनेत अपेक्षित आहे. औरंगाबादकरांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे.

 

औरंगाबाद मनपातर्फे खाम नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरु

  • आतापर्यंत केंद्राचा हा उपक्रम गंगा नदी आणि गंगेच्या काठावर असलेल्या गावांपुरताच मर्यादित होता.
    मात्र आता ज्या शहरांतून नदी वाहते किंवा जी शहरे नदीच्या काठावर वसलेली आहेत, त्यांचाही या उपक्रमात समावेश करण्यात आला आहे.
  • यात देशातील तीस शहरांचा समावेश असून त्यात महाराष्ट्र आणि पुणे या दोन शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
  • नदीकाठच्या शहरांच्या गटात औरंगाबाद व पुणे नदीच्या काठावर वसलेली शहरे किंवा ज्या शहरांतून नदी वाहते, अशा शहरांचे एक संघटन अर्थात रिव्हर सिटी अलायन्स केंद्र सरकारने तयार केले आहे.
  • औरंगाबाद मनपातर्फे खाम नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरु असून पुणे मनपादेखील मुळा-मुठा नदीच्या संदर्भाने काम सुरु आहे.
  • या दोन्ही शहरांतील कामाची दखल केंद्र सरकारने घेतली आहे, अशी माहिती सोमवारी औरंगाबाद मनपाचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.

खाम नदीला मिळणार नवसंजीवनी

  • काही शतकांपूर्वी खाम नदी औरंगाबाद शहरातून खळाळून वाहत होती.
  • स्वातंत्र्यानंतरही काही वर्षे तिचे पाणी स्वच्छ होते. मात्र १९७० नंतर हर्सूल तलावापासून पुढे नागरी वसाहती वाढल्या.
  • अनेकांनी नदीपात्रात घरे बांधली.
  • ड्रेनेज वाहिन्या सोडल्या.
  • कचरा टाकणे सुरु झाले.
  • त्यामुळे नदीचे पाणी दूषित होत गेले.
  • २००४-२००५ मध्ये सामाजिक चळवळीतील नेत्यांनी स्वच्छता मोहीम राबवली.
  • पण ती फार काळ प्रभावी ठरली नाही.
  • त्यानंतर मागील वर्षी मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी नदी पुनरुज्जीवनाची मोहीम हाती घेतली.
  • लोकसहभाग व मनपातरत्फे सौंदर्यीकरणाची कामे हाती घेतली.
  • त्याची माहिती त्यांनी नमामि गंगे योजनेचे महासंचालक राजीव रंजन मिश्र यांना दिली.
  • औरंगाबादेतल्या खाम नदीला संजीवनी देण्यासाठी सुरु असलेल्या कामांमुळे ते प्रभावित झाले.
  • त्यामुळे त्यांनी नमामि गंगा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात खाम नदीचा समावेश केला.
  • आता प्रकल्प अहवाल सादर करुन मंजुरी मिळाल्यानंतर केंद्राकडून मनपा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी ठोस निधी मिळेल.
  • यामुळे नदीकाठच्या लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच नदीचे प्रदूषण रोखण्याकरिता वापरला जाणार आहे.

नमामि गंगा योजना काय आहे?

  • केंद्र सरकारने १३ मे २०१५ रोजी गंगा आणि सहाय्यक नद्यांच्या संरक्षणासाठी नमामि गंगा योजनेला मंजुरी दिली.
  • त्यात ऑगस्ट २०२१ पर्यंत ३०,२२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून ११,८४२ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
  • योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरात नदीकाठावरील ३०० पैकी ३० शहरांचा समावेश झाला आहे.
  • यात राज्यातील औरंगाबाद व पुण्याची निवड झाली आहे.

Tags: AurangabadKham rivernamami gange projectpuneऔरंगाबादखाम नदीनमामि गंगे योजनापुणे
Previous Post

ममता बॅनर्जींच्या आमदारकीच्या शपथेत राज्यपालांचा स्पीडब्रेकर!

Next Post

लखीमपूरमधील शेतकरी हत्याकांडामुळे भाजपाच्या गोटात घबराट!

Next Post
BJP

लखीमपूरमधील शेतकरी हत्याकांडामुळे भाजपाच्या गोटात घबराट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!