मुक्तपीठ टीम
उत्तरप्रदेशातील लखीमपूरमधील शेतकरी हत्याकांडामुळे भाजपाच्या गोटात घबराट पसरली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांचा मुलगा आरोपी असलेल्या प्रकरणामुळे भाजपासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. उत्तर प्रदेशाच्या तराई भागातील या जिल्ह्यात भाजपाने २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत सर्व ८ जागा जिंकल्या होत्या. २०१२ च्या तुलनेत हे एक मोठे यश होते, जेव्हा पक्षाला फक्त एकच जागा मिळाली होती. या जिल्ह्यात बहुसंख्या शेतकरी मतदार आहेत. मंत्रीपुत्राच्या गाडीखाली शेतकरी चिरडले गेल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांची मनं आणि मतं फिरल्यास फटका बसण्याची भीती भाजपाला सतावत आहे.
- तराई भागात बहुसंख्य मतदार हे शेतकरी आहेत.
- पिकांचे भाव आणि शेतकऱ्यांशी संबंधित इतर मुद्दे येथे नेहमीच महत्त्वाचे राहिले आहेत.
- फाळणीनंतर या भागात स्थायिक झालेले शीख शेतकरीही मोठ्या संख्येने आहेत.
- त्यामुळे या हिंसेमुळे भाजपला लखीमपूर खेरीसह मोठ्या भागात नुकसान होण्याची भीती आहे.
- या घटनेचा परिणाम पीलीभीत, शाहजहाँपूर, हरदोई, सीतापूर आणि लखीमपूर खेरीला लागून असलेल्या बहराइचमध्येही दिसू शकतो.
- या सर्व जिल्ह्यांमध्ये भाजपाने २०१७ च्या निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती.
- या ६ जिल्ह्यांमधील ४२ पैकी ३७ विधानसभा जागा भाजपाने जिंकल्या होत्या.
प्रमुख विरोधीपक्ष सपाला बसला होता फटका
- ४०३ जागा असणारी उत्तरप्रदेश विधानसभेत या जिल्ह्यांचे महत्त्व खूप जास्त आहे.
- येथे लाभलेले पक्ष अनेकदा सत्तेचा मार्ग स्वीकारत आले आहेत.
- २०१२ मध्ये सपाने येथून २५ जागा जिंकल्या होत्या आणि सत्ताही मिळवली होती.
- यानंतर २०१७ मध्येही हाच ट्रेंड दिसून आला.
- काँग्रेससोबत निवडणूक लढवणाऱ्या सपाला केवळ ४ जागा मिळू शकल्याने पक्षाचे हे मोठे यश होते.
- याशिवाय, बसपाला एक जागा मिळाली आणि काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती.
- या घटनेमुळे गेल्या निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती होऊ शकणार नाही, अशी भीती भाजपला आहे.