Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पनामा आणि पॅराडाईज पेपर लीक घोटाळ्यात भारतीयांचे २० हजार ३५३ कोटी रुपये!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Parliament

मुक्तपीठ टीम

पनामा आणि पॅराडाईज पेपर लीक घोटाळ्याशी संबंधित भारताशी संलग्न ९३० संस्थांचे १ ऑक्टोबर २०२१ पर्यंत एकूण २० हजार ३५३ कोटी रुपये आहेत. केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

प्राप्तिकर कायदा, 1961 आणि काळा पैसा (अघोषित परकीय उत्पन्न आणि मालमत्ता) आणि कर कायदा, 2015 इ.यांसारख्या प्राप्तिकर विभागाद्वारे अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या विविध कायद्यांच्या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत प्राप्तिकर विभाग योग्य ती कारवाई करतो, असे मंत्री म्हणाले. प्रत्यक्ष कर कायद्यांतर्गत अशा कारवायांमध्ये जिथे लागू असेल तिथे , तपास आणि जप्ती, सर्वेक्षण, चौकशी, उत्पन्नाचे मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकन, व्याजासह कर आकारणी, दंड आकारणे, फौजदारी न्यायालयात खटल्याच्या तक्रारी दाखल करणे इत्यादींचा समावेश आहे.

 

पनामा आणि पॅराडाईज पेपर लीकच्या 52 (बावन्न) प्रकरणांमध्ये, काळा पैसा (अघोषित परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता) आणि कर कायदा, 2015 अंतर्गत फौजदारी खटल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, 130 प्रकरणांमध्ये काळा पैसा (अघोषित परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता) आणि कर कायदा, 2015 अंतर्गत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.पनामा आणि पॅराडाईज पेपर लीक घोटाळ्यामधील आतापर्यंत करांची 153.88 कोटी रुपये रक्कम जमा झाली आहे, असे यासंदर्भात अधिक तपशील देताना मंत्र्यानी सांगितले.

 

पेंडोरा पेपर्स लीकशी कथित संबंध असलेली काही भारतीय नावे प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहेत. भारत सरकारने याची दखल घेतली असून समन्वित आणि जलद तपासाच्या उद्देशाने पेंडोरा पेपर्स लीकचा तपस बहु संस्था समूहाच्या (एमएजी) छत्राखाली आणला आहे, याची स्थापना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षांच्या संयोजकत्वाखाली करण्यात आली आहे, ज्यामध्ये सक्त वसुली संचालनालय (ईडी ), भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय ), भारताचा आर्थिक गुप्तचर विभाग (एफ आय यू -आयएनडी ) आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे परदेशी कर आणि कर संशोधन विभाग या सदस्य संस्था आहेत, अशी माहिती चौधरी यांनी दिली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.


Tags: Panama PapersPandoraParadiseParadise and Panama Papersपँडोरापनामा पेपर्सपॅराडाईझपॅराडाईझ आणि पनामा पेपर्स
Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा

Next Post

“राज्यात बैलगाडी शर्यत सुरु होणारच”

Next Post
Sunil Kedar

"राज्यात बैलगाडी शर्यत सुरु होणारच"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!