Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना रूग्णांसाठी धावणार आता ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Oxygen Express

मुक्तपीठ टीम

 

कोरोनाची दुसरी लाट देशात पसरली असून सगळीकडे परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांवरील उपचारात आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनच्या टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. महाराष्ट्राप्रमाणेच देशातील बर्‍याच राज्यांत ऑक्सिजनची कमतरता असल्याची वाढत आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी भारतीय रेल्वेने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलिंडर वाहून नेण्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस सुरु केली आहे.

 

ऑक्सिजन एक्सप्रेसला देण्यात येणार ग्रीन कॉरिडोर

या ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ साठी एक खास ग्रीन कॉरिडोर देण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही एक रोल-ऑन-रेल-ऑफ म्हणजेच रोरो ट्रेन आहे, ज्यावर ट्रक किंवा टँकर वाहतूक केली जाते. रिकामी टँकर मुंबई आणि आसपासच्या कळंबोली आणि बोईसर स्थानकांवरून विशाखापट्टणम, जमशेदपूर, राउरकेला आणि बोकारो येथून लिक्विड मेडिकल ऑक्सिजन भरण्यासाठी जा-ये करतील. ट्रेन सुरू करण्यासाठी सध्या फ्रेट फ्लॅट वॅगनवर टँकर ठेवण्यात आले आहेत. ट्रेन आल्यानंतर हे टँकर रस्त्याने महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पाठवले जातील.

ट्रेनच्या फ्लॅट वॅगन्सवर ३२टँकर ठेवता येतील. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील सरकारांनी यापूर्वी रेल्वेला आपल्या रेल्वे नेटवर्कद्वारे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकर एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेले जाऊ शकतात का असा सवाल केला होता. दोन राज्य सरकारच्या विनंतीवरून रेल्वेने लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या हालचालींसाठी तांत्रिक बाबींवर त्वरित विचार करण्यास सुरवात केला. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील बोईसर रेल्वे यार्ड येथून ऑक्सिजन एक्सप्रेस धावेल.

 

ऑक्सिजन एक्स्प्रेस मोहिमेअंतर्गत जिथे जिथे मागणी आहे त्या ठिकाणी आम्ही ऑक्सिजन पाठवू असे एका अधिकाऱ्याने सांगितले. १७ एप्रिल रोजी लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या वाहतुकीसंदर्भात रेल्वे मंडळाचे अधिकारी, राज्य परिवहन आयुक्त आणि उद्योग प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली. रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, झोनल रेल्वे केंद्रांना टँकर घेण्याची, लोड करण्याची आणि त्यांना परत पाठविण्याची तयारी दर्शविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशाखापट्टणम, अंगुल आणि भिलाई येथे रॅम्प तयार करण्यात आले आहेत. कळंबोलीमध्ये यापूर्वी अस्तित्त्वात असलेल्या रॅम्पला मजबूत केले जात आहे. मंत्रालयाने सांगितले की, कळंबोली रॅम्प १९ एप्रिलपर्यंत तयार होईल. टँकर इतर ठिकाणी येण्यापूर्वीच रॅम्प तयार होतील.


Tags: Maharashtraऑक्सिजन एक्स्प्रेसऑक्सिजन एक्स्प्रेस मोहिम
Previous Post

हवेतून ऑक्सिजन! गडहिंग्लजचं स्वावलंबी रुग्णालय!

Next Post

महिलांसाठी एनटीपीसीमध्ये ५० जागांवर खास भरती

Next Post
NTPC

महिलांसाठी एनटीपीसीमध्ये ५० जागांवर खास भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!