Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ठाण्याच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन डिस्ट्रिब्युशन प्लांट!

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेला राज्य शासनाकडून मान्यता

April 19, 2021
in घडलं-बिघडलं
0
eknath shinde

मुक्तपीठ टीम

ठाणे महानगरपालिकेच्या धर्तीवर जिल्हास्तरावर पीएसए म्हणजेच ऑक्सिजन डिस्ट्रिब्युशन प्लांट उभारणीला परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी आज राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे यांनी ही मागणी केली.

 

कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर रुग्णांना बेड, ऑक्सिजन पूरवठा आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने तो उपलब्ध करून देण्याबाबत या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.

 

यावेळी, ऑक्सिजन पुरवठ्याबाबत लोकांना तातडीने दिलासा देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने शहरात तीन ठिकाणी ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या धर्तीवर ज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन जनरेशन आणि डिस्ट्रिब्युशन प्लांट उभारणीला तात्काळ मंजुरी मिळावी, महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना याबाबतचे सर्वाधिकार द्यावेत; तसेच हवेतून ऑक्सिजन घेऊन पेशंटला पुरवणाऱ्या पोर्टेबल ऑक्सिजन कॉंसंट्रेटरच्या खरेदीला देखील तात्काळ मंजुरी देण्यात यावी. ही खरेदी जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर व्हावी, अशी मागणी शिंदे यांनी केली. या मागणीला तात्काळ मंजुरी देत तसा शासन आदेश काढण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 

यावेळी ठाणे शहरातील कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सद्यस्थितीत १६ हजार एक्टिव्ह पेशंट शहरात, तर जिल्ह्यात ५६ हजार रुग्ण आहेत. यापैकी बहुतांश पेशंटला ऑक्सिजनची गरज लागत आहे. अशात शासनाकडून देण्यात येणारा १८० मेट्रिक टन पुरवठा कमी पडत असल्याने तो ३०० मेट्रिक टन पर्यंत वाढवून मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.

 

राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने रुग्णांचे जीव धोक्यात आले आहेत. हे इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांची वनवण करावी लागत आहे. त्यामुळे सरकारकडून मान्यताप्राप्त ७ कंपन्यांकडून हे औषध खरेदी करताना किमतीवरून हात आखडता न घेता लवकरात लवकर या इंजेक्शनची खरेदी करून सर्वसामान्य लोकांना दिलासा द्यावा अशी सूचना शिंदे यांनी केली.

 


Tags: ajit pawarMinister Eknath ShindeOxygen distribution plantthaneउपमुख्यमंत्री अजित पवाररेमडेसिवीर इंजेक्शन
Previous Post

कोरोनाने लोक मरत असताना व्हेंटिलटर धुळीत टाकण्याचे पाप! दोषी कोण?

Next Post

माणुसकीसाठी त्याने जीव पणाला लावला…त्याच्या हिंमतीला रेल्वेही रोखू शकली नाही!

Next Post
mayur

माणुसकीसाठी त्याने जीव पणाला लावला...त्याच्या हिंमतीला रेल्वेही रोखू शकली नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!