Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनाने लोक मरत असताना व्हेंटिलटर धुळीत टाकण्याचे पाप! दोषी कोण?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Pusad

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने राज्यात आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाला आहे, यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. कोरोना उपचारात आवश्यक व्हेंटिलेटरवरून राजकीय संघर्षही घडत असताना दुसरीकडे पुसद सारख्या सरकारी रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर धूळ खात पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. लोकांचे जीव जात असताना प्राणरक्षक व्हेंटिलेटर धुळीत पडू देण्याचे पाप कुणाचे? त्यासाठी दोषींवर कारवाई होणार का, हा प्रश्न महत्वाचा ठरत आहे.

ताजा प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील पुसद उपजिल्हा रुग्णालयातील आहे. तिथे तब्बल सात महिन्यांपासून १० व्हेंटिलेटर धूळखात पडले आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयात जागा नाही. पुसदसारख्या छोट्या शहरांमध्येच नाही तर मोठ्या महानगरांमध्येही व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याच्या कारणावरून अनेकांना दुसरीकडे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत उपचारासाठी आवश्यक व्हेंटिलेटरसारखी यंत्रसामग्री कमी पडत असल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो आहे. रोजच अशा तक्रारींचे टाहो कानी पडत आहेत.

अशा भीषण परिस्थितीत पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये १० व्हेंटिलेटर धूळखात पडले आहे. हा अनागोंदी कारभार लक्षात आल्यानंतर पुसद येथील नगरसेवक साकीब शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली. व्हेंटिलेटरअभावी अनेक लोकांना प्राणाला मुकावे लागले आणि अशात जीव वाचविणारी यंत्र सामुग्री धूळखात पडलेली असल्याने ती त्वरित जनसामान्यांच्या उपयोगात आणावी अशी विनंती त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडेही केली.

पीएम केअर फंड अंतर्गत रुग्णालयाला मिळाले होते व्हेंटिलेटर

  • गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान योजनेतून १० व्हेंटिलेटर पुरवण्यात आले होते.
  • मात्र भूलतज्ज्ञ,डॉक्टर उपलब्ध नसल्याने व्हेंटिलेटर आजपर्यंत उपयोगात आले नाही.
  • आता प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यापैकी ५ व्हेंटिलेटर्स यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात येत आहेत, असे डॉ. हरिभाऊ फुफाटे यांनी सांगितले.

आज व्हेंटिलेटर धूळखात पडून असल्याचा प्रकार पुढे आल्यानंतर पुसद  उपविभागीय अधिकाऱ्यांनी पुसद उपजिल्हा रुग्णालयात पाहणी केली .


Tags: कोरोनापंतप्रधान नरेंद्र मोदीमुख्यमंत्री उद्धव ठाकरेयवतमाळव्हेंटिलेटर
Previous Post

“संजय राऊत, आधी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करा”

Next Post

ठाण्याच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन डिस्ट्रिब्युशन प्लांट!

Next Post
eknath shinde

ठाण्याच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन डिस्ट्रिब्युशन प्लांट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!