Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कुत्र्याच्या आरामदायी प्रवासासाठी, मालकाने एअर इंडियाचा बिझनेस क्लास केला बुक!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Dog

मुक्तपीठ टीम

कुत्रा आणि माणसाची मैत्री ही हजारो वर्षांपासूनची आहे. अनेकदा मानवी नात्यांपेक्षाही माणसं कुत्र्यांवर जास्त विश्वास ठेवतात. आणि कुत्रेही प्रसंगी जीवाची किंमत मोजत निष्ठा राखतात. कोरोना संकटातील अनेकांसाठीच्या सक्तीच्या एकाकीपणात तर कुत्र्यांचे महत्व अधिकच उमगलं. बहुधा त्यामुळेच कुत्र्यांचे महत्वही वाढताना दिसत आहे. एकीकडे भटक्या कुत्र्यांसाठी रोज ताजे जेवण पुरवणारी अनेक माणसे दिसली तसेच दुसरीकडे आपल्या कुत्र्यालाही आपल्यासारखंच जगता यावं, म्हणून प्रयत्न करणारी माणसंही दिसली. अशाच एका श्वान मालकानं आपल्या लाडक्या कुत्र्याला सोबत नेता यावं म्हणून मुंबई चेन्नई विमानातील बिझनेस क्लासची सर्व तिकीटं खरेदी केली. त्यासाठी त्या मालकाने तब्बल अडीच लाख रुपये मोजले आहेत.

 

मुंबईहून चेन्नईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये एका मालकाने त्याच्या कुत्र्यासाठी सर्व बिझनेस क्लास सीट बुक केल्या होत्या. दोन तासांच्या या फ्लाइटसाठी मालकाने अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च केले आहेत. कोरोना महामारी थांबल्यानंतर देशांतर्गत उड्डाणे पूर्ण क्षमतेने कार्यरत असताना ही घटना घडली आहे.

  • एअर इंडिया विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये फक्त दोन प्रवासी म्हणजेच तो कुत्रा आणि त्याचा मालक होता.
  • मालकाने एअर इंडियाच्या विमानात त्याच्या माल्टीज जातीच्या कुत्र्याला मुंबईहून चेन्नईला नेण्यासाठी पूर्ण बिझनेस क्लास सीट बुक केले होते.
  • माल्टीज जातीचा हा कुत्रा त्याच्या मालकासह सकाळी एअर इंडियाच्या विमान एआय-671 मधून चेन्नईला निघाला.
  • ए 320 विमानात एअर इंडियाच्या जे-क्लास केबिनमध्ये 12 जागा आहेत म्हणजेच कुत्र्याने पूर्ण लक्झरीसह हा प्रवास पूर्ण केला.
  • एअर इंडियाच्या बिझनेस क्लासचे मुंबई ते चेन्नईचे एका सीटचे भाडे सुमारे 20,000 रुपये आहे.
  • मालकाने संपूर्ण क्लास बुक करत त्याच्या कुत्र्याचा प्रवास आरामदायक करण्यासाठी सुमारे 2.5 लाख रुपये खर्च केले.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Air indiaBogcoronaएअर इंडियामुंबई चेन्नई
Previous Post

महाराष्ट्र कोरोना रिपोर्ट: सोमवार, २०  सप्टेंबर  २०२१

Next Post

सेकंदाला साडेतीनपेक्षा जास्त जीबी 5G वेग! व्होडाफोन आयडियाचा विक्रम!!

Next Post
VI 5G

सेकंदाला साडेतीनपेक्षा जास्त जीबी 5G वेग! व्होडाफोन आयडियाचा विक्रम!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!