मुक्तपीठ टीम
कुत्रा आणि माणसाची मैत्री ही हजारो वर्षांपासूनची आहे. अनेकदा मानवी नात्यांपेक्षाही माणसं कुत्र्यांवर जास्त विश्वास ठेवतात. आणि कुत्रेही प्रसंगी जीवाची किंमत मोजत निष्ठा राखतात. कोरोना संकटातील अनेकांसाठीच्या सक्तीच्या एकाकीपणात तर कुत्र्यांचे महत्व अधिकच उमगलं. बहुधा त्यामुळेच कुत्र्यांचे महत्वही वाढताना दिसत आहे. एकीकडे भटक्या कुत्र्यांसाठी रोज ताजे जेवण पुरवणारी अनेक माणसे दिसली तसेच दुसरीकडे आपल्या कुत्र्यालाही आपल्यासारखंच जगता यावं, म्हणून प्रयत्न करणारी माणसंही दिसली. अशाच एका श्वान मालकानं आपल्या लाडक्या कुत्र्याला सोबत नेता यावं म्हणून मुंबई चेन्नई विमानातील बिझनेस क्लासची सर्व तिकीटं खरेदी केली. त्यासाठी त्या मालकाने तब्बल अडीच लाख रुपये मोजले आहेत.
मुंबईहून चेन्नईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये एका मालकाने त्याच्या कुत्र्यासाठी सर्व बिझनेस क्लास सीट बुक केल्या होत्या. दोन तासांच्या या फ्लाइटसाठी मालकाने अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च केले आहेत. कोरोना महामारी थांबल्यानंतर देशांतर्गत उड्डाणे पूर्ण क्षमतेने कार्यरत असताना ही घटना घडली आहे.
- एअर इंडिया विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये फक्त दोन प्रवासी म्हणजेच तो कुत्रा आणि त्याचा मालक होता.
- मालकाने एअर इंडियाच्या विमानात त्याच्या माल्टीज जातीच्या कुत्र्याला मुंबईहून चेन्नईला नेण्यासाठी पूर्ण बिझनेस क्लास सीट बुक केले होते.
- माल्टीज जातीचा हा कुत्रा त्याच्या मालकासह सकाळी एअर इंडियाच्या विमान एआय-671 मधून चेन्नईला निघाला.
- ए 320 विमानात एअर इंडियाच्या जे-क्लास केबिनमध्ये 12 जागा आहेत म्हणजेच कुत्र्याने पूर्ण लक्झरीसह हा प्रवास पूर्ण केला.
- एअर इंडियाच्या बिझनेस क्लासचे मुंबई ते चेन्नईचे एका सीटचे भाडे सुमारे 20,000 रुपये आहे.
- मालकाने संपूर्ण क्लास बुक करत त्याच्या कुत्र्याचा प्रवास आरामदायक करण्यासाठी सुमारे 2.5 लाख रुपये खर्च केले.