Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“उत्तर प्रदेशात जाण्यासाठी व्हिसा घ्यावा लागणार का”?

दुसऱ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा यूपीत लँडिंग बंदीनंतर संतप्त सवाल

October 4, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
visa

मुक्तपीठ टीम

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या शेतकरी हत्याकांडानंतर भाजपा सरकारने विरोधी पक्षांच्या नेत्यांवर अनेक बंधनं लादली आहेत. प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांना अटकाव केला गेला असतानाच आता दुसऱ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही यूपीत लँडिंगची परवानगी दिली गेलेली नाही. छत्तीसगडनंतर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनाही लँडिंगची परवानगी नाकारली गेली आहे. त्यामुळे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी स्पष्टपणे “उत्तर प्रदेशात जाण्यासाठी व्हिसा घ्यावा लागणार का”? असा सवाल विचारला आहे.

 

पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी काँग्रेसचे नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना जायचे होते. पण त्यांना लँडिग परवानगी दिलेली नाही. भूपेश बघेल यांनी स्पष्ट केले की जर लखीमपूरमध्ये कलम १४४ लागू आहे, तर लोकांना लखऊला जाण्यापासून का रोखले जात आहे? त्यांनी प्रश्न केला की उत्तर प्रदेशातील लोकांना कोणतेही अधिकार नाहीत का? लोकांना लखीमपूर खेरीला जाण्यापासून का रोखले जात आहे? यासह, त्याने हे देखील विचारले की उत्तर प्रदेशात जाण्यासाठी व्हिसा घ्यावा लागेल का?

 

ते एवढ्यावरच थांबवले नाही. ते म्हणाले की, “तुमच्या ह्या वागणुकीने हे स्पष्ट होते की तुम्ही जर भाजपाच्या विरोधात उभे राहिलात तर तुम्ही चिरडले जाल. येथे शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने वागणूक दिली जात आहे, ती यूपी सरकारची मानसिकता दर्शवते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की उत्तर प्रदेश सरकारने सध्याच्या परिस्थितीत दोन्ही काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या लखनौमध्ये येण्यवर बंदी लावली आहे”.

 

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनाही परवानगी नाही

  • उत्तरप्रदेश सरकारने पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनाही परवानगी दिलेली नाही.
  • पंजाबच्या नागरी उड्डयन संचालकांनी मुख्यमंत्र्यांच्या लखीमपूरला लँडिंगसाठी परवानगी मागणारे पत्र लिहिले आहे.
  • तसेच सपा प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव लखीमपूर प्रकरणातील पीडितांना भेटायला जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना नजरकैदेत ठेवले.
  • त्यांच्या घराबाहेर १६ चाकी ट्रक लावून मार्ग अडवण्यात आला.

Tags: chattisgadhcm bhupesh baghelcm charanjit singh channimuktpeethpanjabvisaछत्तीसगडमुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नीमुख्यमंत्री भूपेश बघेल
Previous Post

उत्तरप्रदेशात शेतकरी हत्याकांड! तर हरियाणात मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांविरोधात ‘लाठीधारी’ फॉर्म्युला!

Next Post

“राज्य सरकारने एमपीएससी उमेदवारांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये”

Next Post
madhav bhandari

"राज्य सरकारने एमपीएससी उमेदवारांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!