Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“राज्य सरकारने एमपीएससी उमेदवारांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये”

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा इशारा

October 4, 2021
in घडलं-बिघडलं
0
madhav bhandari

मुक्तपीठ टीम

राज्य लोकसेवा आयोगाकडून विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती देण्यात अक्षम्य विलंब होत असल्याने उमेदवारांना वैफल्य येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने अशा पात्र उमेदवारांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तातडीने त्यांना नियुक्ती पत्रे द्यावीत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. राज्य प्रशासनाच्या सेवेतील रिक्त पदांची माहिती ३० सप्टेंबरपर्यंत सादर करण्यास सांगितले होते, मात्र ही मुदतही पाळली गेली नसल्याने आघाडी सरकारची असंवेदनशीलता दिसून आली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

भांडारी यांनी पत्रकात म्हटले आहे की, उत्तीर्ण होऊनही दीड वर्ष नियुक्ती न झाल्याने स्वप्नील लोणकर या युवकाने आत्महत्या केल्याची घटना ताजी आहे. या घटनेतून राज्य सरकारने काहीच धडा घेतल्याचे दिसत नाही. रिक्त पदे भरण्याबाबत राज्य शासनाचे ‘तारीख पे तारीख’ धोरण उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मुळावर येत आहे. सहायक वाहन निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ४७ उमेदवारांना अजून नियुक्ती मिळाली नसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. नियमांवर बोट ठेवून या उमेदवारांची नियुक्ती प्रशासनाने थांबविली आहे. उमेदवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य मंत्र्यांनाही याबाबत निवेदन देऊन काहीच उपयोग झाला नाही.

 

राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या रिक्त जागा भरण्याची मागणी भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी केली. तेंव्हा कुठे सरकारने सदस्यांच्या रिक्त जागा भरल्या. उपमुख्यमंत्र्यांनी शासनाच्या सर्व विभागांना रिक्त पदांची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे ३० सप्टेंबरपर्यंत सादर करण्यास सांगितली होती. मात्र या मुदतीत सर्व विभागांनी माहिती सादर केली नाही. राज्य सरकारला रिक्त पदे भरण्याची इच्छाच नाही हेच या दिरंगाईतून दिसून येत असल्याचे भांडारी यांनी पत्रकात नमूद केले आहे.


Tags: BJPDeputy Chief Minister Ajit Pawarmadhav bhandariMPSCउपमुख्यमंत्री अजित पवारएमपीएससीभाजपामाधव भांडारीराज्य लोकसेवा आयोगराज्य सरकार
Previous Post

“उत्तर प्रदेशात जाण्यासाठी व्हिसा घ्यावा लागणार का”?

Next Post

“विद्यार्थी व शिक्षकांचा उत्साह पाहून वेगळाच आनंद झाला”: धनंजय मुंडे

Next Post
dhananjay munde

"विद्यार्थी व शिक्षकांचा उत्साह पाहून वेगळाच आनंद झाला": धनंजय मुंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!