Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उत्तरप्रदेशात शेतकरी हत्याकांड! तर हरियाणात मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांविरोधात ‘लाठीधारी’ फॉर्म्युला!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
haryana

मुक्तपीठ टीम

उत्तरप्रदेशात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष मिश्राला चार शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे. ते प्रकरण तापलेलं असतानाच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांचे शेतकऱ्यांबाबतचे वादग्रस्त विधान गाजू लागले आहे. चंदीगडमध्ये शेतकऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आवाहन केली की, शेतकऱ्यांच्याविरोधात लाठी उचलणारे स्वयंसेवक उत्तर-पश्चिम हरियाणाच्या प्रत्येक जिल्ह्यात उभे केले पाहिजेत.

 

मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या वादग्रस्त चिथावणीखोर भाषणाचा एक व्हिडीओ वायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री सांगत आहेत, ‘काही नवीन शेतकरी संघटना उदयास येत आहेत. आता त्यांना प्रोत्साहन द्यावे लागेल. त्यांना पुढे आणावे लागेल. विशेषतः उत्तर आणि पश्चिम हरियाणामध्ये. दक्षिण हरियाणात ही समस्या फारशी नाही. पण उत्तर-पश्चिम हरियाणाच्या प्रत्येक जिल्ह्यात तुमचे ५००-७०० शेतकरी किंवा हजार लोक उभे करा. त्यांना स्वयंसेवक बनवा. आणि मग होऊ द्या ‘शथे शत्यम समचरेत’.

 

तुरुंगात कशाला? मी पाहून घेईन!

  • मुख्यमंत्र्यांनी लोकांना त्यांच्या विधानाचा अर्थ विचारला.
  • उपस्थित लोकांकडून उत्तर आले जशास तसे!
  • मुख्यमंत्री खट्टर यांनी प्रोत्साहन दिले.
  • काही लोकांनी टाळ्या वाजवल्या.
  • काही म्हणालेत की, ते ठिक आहे, पण मी पाहिन.
  • असे म्हणत मुख्यमंत्री हसायला लागतात.
  • शेवटी मुख्यमंत्री म्हणाले, ‘नाही-नाही, २-४ महिन्यांत तुम्ही आपोआप मोठे नेते व्हाल. काळजी करू नका. इतिहासात नाव लिहिले जाईल.

 

हरियाणातच अतिरक्ति दंडाधिकाऱ्यांनी दिले होते डोके फोडण्याचे आदेश!

  • हरियाणामधील भाजपा सरकारची भूमिका नेहमीच शेतकरी आंदोलन चिरडण्याची राहिली आहे.
  • २८ ऑगस्ट २०२१ रोजी मुख्यमंत्री खट्टर कर्नालमध्ये भाजपाची बैठक घेत असताना सभास्थळापासून काही अंतरावरच कर्नालचे तत्कालीन एसडीएम आयुष सिन्हा यांनी पोलिसांना शेतकऱ्यांचे डोके फोडण्याचा वादग्रस्त आदेश दिला होता.
  • ते पोलिसांना हिंसाचारासाठी चिथावत असल्याचा व्हिडीओ वायरल झाला होता.
  • यावर बराच गदारोळ झाला आणि शेतकऱ्यांनी महापंचायत बोलवून मिनी सचिवालयाला घेराव घातला.
  • त्यानंतर राज्य सरकारला माघार घेत न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश द्यावे लागले आणि आयुष सिन्हांना चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर पाठवावे लागले.

Tags: haryanaअजय मिश्रा तेनीआशिष मिश्राभाजपामनोहरलाल खट्टरहरियाणा
Previous Post

“लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या खुनांचा तीव्र धिक्कार!”

Next Post

“उत्तर प्रदेशात जाण्यासाठी व्हिसा घ्यावा लागणार का”?

Next Post
visa

"उत्तर प्रदेशात जाण्यासाठी व्हिसा घ्यावा लागणार का"?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!