Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोकणात जायचंय…आता ‘टोल’धाड सुरु!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Toll Naka

मुक्तपीठ टीम

मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना आता पैसे मोजावे लागणार आहेत. मुंबई-गोवा महामार्गवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव टोलनाका अखेर १ जूनपासून सुरु करण्यात येणार आहे. विविध स्तरावरून या ओसरगाव टोल नाक्यावरील टोल वसुलीला विरोध झाल्यानंतर देखील हा टोलनाका उद्यापासून सुरु होत आहे.

किती असणार टोल?

  • टोल नाक्यापासून वीस किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या वाहनांना मासिक ३१५ रुपयांचा पास देण्यात येणार आहे.
  • तर इतर वाहनांना मात्र टोल भरावा लागणार आहे.
  • बाईक, स्कूटी आणि रिक्षा यांना टोलमधून सूट देण्यात आली आहे.
  • त्यामुळे कोकणातील रिक्षा चालकांना या टोल वसुलीतून दिलासा मिळालाय.
  • दुसरीकडे फास्ट टॅग असलेल्या वाहनांना टोलची पन्नास टक्के रक्कम भरावी लागेल.
  • या टोल वसुलीचं कंत्राट एमटी करीमुनिसा कंपनीकडे देण्यात आलंय.

ओसरगाव टोलचा दर

  • जीप, व्हॅन, कार-सिंगल जर्नी ९० रुपये, रिर्टन जर्नी टोल घेतल्यास १३५रुपये
  • हलकी व्यावसायिक वाहनं, मोठी मालवाहू वाहनं आणि मिनीबससाठी १३५ रुपये, रिटर्न जर्नीसाठी २२० रुपये
  • ट्रक आणि बससाठी (डबल अँक्सल)- ३०५ रुपये, रिटर्न जर्नीसाठी ४६० रुपये
  • ट्रक आणि बस (ट्रिपल ॲक्सल) – ३३५ रुपये, रिटर्न जर्नीसाठी – ५०० रुपये
  • MH 07 पासिंग वाहनांसाठी ४५ रुपये
  • टोल MH 07 पासिंग मिनीबससाठी ७५ रुपये
  • MH 07 पासिंग ट्रक – बससाठी ११५ रुपये

टोलनाक्यामुळे नाराजीचे सूर

  • मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरणाचं काम गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे.
  • या महामार्गावरील बहुतांश काम पूर्ण झालं असून मुंबई-गोवा महामार्गाचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे.
  • गेल्या अनेक दिवसांपासून ओसरगाव हा टोल कधी सुरु होणार, याकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचं लक्ष लागलं होतं.
  • तूर्तास टोल सुरु करु नये यावरून वातावरणही तापलेलं होतं.
  • उद्यापासून ओसरगावचा टोलनाका सुरु करण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालंय.
  • हा टोलनाका सुरु होत असल्यानं वाहनचालकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय.
  • टोल सुरु केल्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोकांना भुर्दंड बसेल, अशी चर्चा रंगली आहे.
  • पण परिसरातील वाहनांना सवलतीचा दर असणार आहे.

Tags: 1 June 2022kokanOsarGaonOsargaon Toll NakaToll Nakaओसरगावओसरगाव टोलनाकाकोकणटोलनाका
Previous Post

सुप्रिया सुळेंचं साकडं: “पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा”, शिवसेना म्हणते…”२५ वर्ष थांबा!”

Next Post

मुंबई मनपाचा कोणता वॉर्ड राखीव, कोणता सर्वसाधारण? वाचा २३६ वॉर्डांची यादी एका क्लिकवर…

Next Post
bmc

मुंबई मनपाचा कोणता वॉर्ड राखीव, कोणता सर्वसाधारण? वाचा २३६ वॉर्डांची यादी एका क्लिकवर...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!