मुक्तपीठ टीम
मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना आता पैसे मोजावे लागणार आहेत. मुंबई-गोवा महामार्गवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव टोलनाका अखेर १ जूनपासून सुरु करण्यात येणार आहे. विविध स्तरावरून या ओसरगाव टोल नाक्यावरील टोल वसुलीला विरोध झाल्यानंतर देखील हा टोलनाका उद्यापासून सुरु होत आहे.
किती असणार टोल?
- टोल नाक्यापासून वीस किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या वाहनांना मासिक ३१५ रुपयांचा पास देण्यात येणार आहे.
- तर इतर वाहनांना मात्र टोल भरावा लागणार आहे.
- बाईक, स्कूटी आणि रिक्षा यांना टोलमधून सूट देण्यात आली आहे.
- त्यामुळे कोकणातील रिक्षा चालकांना या टोल वसुलीतून दिलासा मिळालाय.
- दुसरीकडे फास्ट टॅग असलेल्या वाहनांना टोलची पन्नास टक्के रक्कम भरावी लागेल.
- या टोल वसुलीचं कंत्राट एमटी करीमुनिसा कंपनीकडे देण्यात आलंय.
ओसरगाव टोलचा दर
- जीप, व्हॅन, कार-सिंगल जर्नी ९० रुपये, रिर्टन जर्नी टोल घेतल्यास १३५रुपये
- हलकी व्यावसायिक वाहनं, मोठी मालवाहू वाहनं आणि मिनीबससाठी १३५ रुपये, रिटर्न जर्नीसाठी २२० रुपये
- ट्रक आणि बससाठी (डबल अँक्सल)- ३०५ रुपये, रिटर्न जर्नीसाठी ४६० रुपये
- ट्रक आणि बस (ट्रिपल ॲक्सल) – ३३५ रुपये, रिटर्न जर्नीसाठी – ५०० रुपये
- MH 07 पासिंग वाहनांसाठी ४५ रुपये
- टोल MH 07 पासिंग मिनीबससाठी ७५ रुपये
- MH 07 पासिंग ट्रक – बससाठी ११५ रुपये
टोलनाक्यामुळे नाराजीचे सूर
- मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरणाचं काम गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे.
- या महामार्गावरील बहुतांश काम पूर्ण झालं असून मुंबई-गोवा महामार्गाचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे.
- गेल्या अनेक दिवसांपासून ओसरगाव हा टोल कधी सुरु होणार, याकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचं लक्ष लागलं होतं.
- तूर्तास टोल सुरु करु नये यावरून वातावरणही तापलेलं होतं.
- उद्यापासून ओसरगावचा टोलनाका सुरु करण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालंय.
- हा टोलनाका सुरु होत असल्यानं वाहनचालकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय.
- टोल सुरु केल्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोकांना भुर्दंड बसेल, अशी चर्चा रंगली आहे.
- पण परिसरातील वाहनांना सवलतीचा दर असणार आहे.