Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वैनगंगेचे प्रदूषण कृती आराखडा ७ दिवसात तयार करण्याचे आदेश

March 2, 2021
in घडलं-बिघडलं
0
Aaditya

मुक्तपीठ टीम

वैनगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. नागपूर, भंडारा, कामठी, कन्हान, मौदा, पवनी येथून निघणाऱ्या प्रत्येक नाला, नदी यांचे मॅपींग करुन, छोटे नाले व ते मिळणाऱ्या नद्या असे वर्गीकरण करुन प्रत्येक ठिकाणाहून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याबाबत रोड मॅप तयार करावा, तसेच त्यासाठी लागणाऱ्या निधीबाबत सविस्तर कृती आराखडा तयार करण्याबाबत यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सूचना केल्या.

बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासह नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, नागपूर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम, नागपूर महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

 

कमी खर्चीक प्रकल्प जसे की, बायोरेमिडेशन, नाले अडवून त्या ठिकाणी प्रक्रिया याबाबत विचार करावा. नदी स्वच्छता रोड मॅप तयार करताना मध्यम व दीर्घ स्वरुपाचा कृती आराखडा तयार करुन ७ दिवसांत सादर करावा. नाले सफाईबाबत एसओपी तयार करावा, अशा सूचनाही मंत्री आदित्य ठाकरे यांनी सर्व संबंधीत विभागांना केल्या. उपस्थित सर्व महापालिका, नगरपालिका यांना त्यांच्या क्षेत्रातून निघणाऱ्या घरगुती सांडपाण्याबाबत मॅपीग करुन, लघु, मध्यम व दीर्घ स्वरुपाचा कृती आराखडा तयार करुन ७ दिवसांत सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

 

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “सांडपाणी प्रक्रिया केंद्रामधून निर्माण होणारे प्रक्रियाकृत सांडपाणी उद्योगांना दुय्यम वापरासाठी बंधनकारक करण्यासंदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास सूचित करावे, जेणेकरुन उद्योगांमध्ये वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर कमी होऊन, हे पाणी इतरत्र वापरता येईल. तसेच ज्या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारली नाहीत त्या ठिकाणी कमी खर्चात नाला टॅपींगद्वारे प्रदूषण कमी करता येईल”, असे त्यांनी सांगितले.

 

पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले की, “तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यात नागपूर शहरातून निघणाऱ्या सर्व नाल्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे महानगरपालिकेने सुधारित कृती आराखडा तयार करावा. तसेच नालेसफाई करताना त्यातून निघणारा गाळ हा नदी, नाल्याकिनारी न टाकता त्याचे शास्रोक्त पध्दतीने योग्य ते व्यवस्थापन करावे”, अशा सूचना त्यांनी दिल्या.

प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव शिनगारे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन वैनगंगा नदी प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या घटकांची माहिती दिली. नागपूरमधून सांडपाणी घेऊन येणाऱ्या नाग नदी, पिवळी नदी तसेच भंडारा, कामठी, कन्हान, मौदा येथील प्रक्रिया न केलेले सांडपाणी घेऊन येणारी कन्हान नदी यामुळे वैनगंगा नदीचे प्रदूषण होते, अशी माहिती देण्यात आली. नागपूर महापालिका आयुक्त यांनीही यासंदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.


Tags: Environment Minister Aditya ThackerayMinister Eknath Shindeपर्यटनमंत्री आदित्य ठाकरेपालकमंत्री एकनाथ शिंदे
Previous Post

नीलम गोऱ्हेंच्या मध्यस्थीनंतर लक्ष्मण गायकवाडांनी सोडले उपोषण

Next Post

“भारतीय शास्त्रीय नृत्यांचे भवितव्य उज्ज्वल” – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Next Post
Bhagat singh

"भारतीय शास्त्रीय नृत्यांचे भवितव्य उज्ज्वल" - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!