Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नौदल कर्मचाऱ्यांना मर्चंट नेव्हीमध्ये संधी, नौदल आणि जहाजबांधणी महासंचालनालयात सामंजस्य करार!

September 6, 2026
in करिअर, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Indian Navy and Directorate General of Shipbuilding

मुक्तपीठ टीम

भारतीय नौदल आणि जहाजबांधणी महासंचालनालय यांच्यादरम्यान एका ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून, या करारामुळे भारतीय नौदलातील कर्मचाऱ्यांना – कार्यरत आणि सेवानिवृत्त दोन्ही- मर्चंट नेव्हीमध्ये स्थित्यंतर करता येणे शक्य होणार आहे.

या सामंजस्य करारामुळे, भारतीय नौदलातील कर्मचाऱ्यांना आंतरराष्ट्रीय STCW (खलाशांसाठी प्रशिक्षण, प्रमाणन आणि टेहळणीविषयक मानके) च्या दर्जाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. जागतिक खलाशांमध्ये भारतीय खलाशांचे प्रमाण वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. तसेच, नील अर्थव्यवस्थेसह, सागरी क्षेत्राला सरकारने दिलेले प्राधान्य लक्षात घेऊन, त्यासाठी कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याच्या दृष्टीनेही हा सामंजस्य करार उपयुक्त ठरणार आहे.

या स्थित्यंतरासाठीची सविस्तर प्रक्रिया महासंचालनालयाने आपल्या आदेश १७ मध्ये जारी केली आहे. या आदेशानुसार, भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी केलेली सागरी सेवा आणि अत्याधुनिक प्रशिक्षण लक्षात घेतले जाणार आहे. तसेच, यात, भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांपासून ते नौसेनिकांपर्यन्त सर्व पदांवरील व्यक्तींचा विचार केला जाणार आहे. तसेच नॉटिकल म्हणजेच सागरी क्षेत्र आणि तंत्रज्ञान क्षेत्र अशा दोन्ही क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा विचार केला जाईल. या योजनेनुसार,नौदल कर्मचाऱ्यांना नौदल सेवेत असताना कार्यक्षमतेचे प्रमाणपत्र मिळेल, ही सुनिश्चित केले जाईल. या कर्मचाऱ्यांनी STCW च्या तरतुदींनुसार, काही अभ्यासक्रम, परीक्षा आणि मर्चंट नेव्हीत किमान सेवा दिल्यानंतर हे प्रमाणपत्र, जागतिक पातळीवरही ग्राह्य धरले जाईल.

यामुळे, भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांना मर्चंट नेव्हीत सुलभतेने स्थित्यंतर करता येईल. केवळ भारतातच नव्हे, तर जगभर त्यांना ही संधी उपलब्ध असेल.

ही स्थित्यंतर योजना, सविस्तर नियोजन आणि परिश्रमानंतर तयार केली गेली आहे. तसेच ती आखतांना, आंतरराष्ट्रीय नियमांसह अनेक घटक विचारात घेतल्या असून त्याच्याशी सुसंगत विविध तरतुदी सादर केल्या आहेत. यामुळे, भारतीय नौदलातील कर्मचार्‍यांना मर्चंट नेव्हीमधील अगदी सर्वोच्च पदापर्यंत नोकरी मिळवणे शक्य होणार आहे. नौदलात पुरेसा अनुभव घेतल्यानंतर नौदल कर्मचारी आता नॉटिकल विषयक अमर्याद टन वजनाच्या परदेशी जाणाऱ्या जहाजांवर मास्टर्स म्हणून तसेच, अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये मुख्य अभियंता पदापर्यंत थेट सहभागी होऊ शकतील.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: careergood newsIndian Navy and Directorate General of Shipbuildingmerchant navymuktpeethnaval personnelReconciliation Agreementकरिअरघडलं-बिघडलंचांगली बातमीनौदल कर्मचारीभारतीय नौदल आणि जहाजबांधणी महासंचालनालयमर्चंट नेव्हीमुक्तपीठसामंजस्य करार
Previous Post

विमानासारखाच ब्लॅक बॉक्स आता मोटर बाइकसाठी! भारतीय तरुणाचे संशोधन!

Next Post

आता Oneplus9 5G झाला आणखी स्वस्त, वाचा नवीन किंमत आणि फिचर्स…..

Next Post
Oneplus9 5G smartphone

आता Oneplus9 5G झाला आणखी स्वस्त, वाचा नवीन किंमत आणि फिचर्स.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!