Saturday, March 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भूमि अभिलेख विभागाची ऑनलाईन परीक्षा २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत

November 23, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
Land Records Department

मुक्तपीठ टीम

भूमि अभिलेख विभागातील गट-क समूह ४ (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) दि.२८ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे,असे पुणे भूमी अभिलेखचे उपसंचालक किशोर तवरेज यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह ४ संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी दि ९ डिसेंबर २०२१ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती.

त्यानुसार ९ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत. त्यानंतर या अर्जदाराना विभागाकडून २८ फेब्रुवारी २०२२ ते १३ मार्च २०२२ या कालावधीत छाननी अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली होती.

छाननी अर्ज प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी अपलोड केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली. भूमि अभिलेख विभागातील गट-क पदांच्या सेवाप्रवेश नियमांनुसार जाहिरातीत नमूद केलेल्या अर्हतेऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्र अपलोड केलेली आहेत. अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपूर्ण प्रक्रियेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची सामान्य प्रशासन विभागाकडील ४ मे २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) २८ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांच्या परीक्षा प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र उमेदवाराने संबंधित संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावे. प्रवेशपत्रावर नमुद परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावी .

परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याकरीता लिंक देखील दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ पासून विभागाच्या उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे श्री. तवरेज यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


Tags: careereducationgood newsLand Records DepartmentmuktpeethOnline Examinationऑनलाईन परीक्षाकरिअरचांगली बातमीभूमि अभिलेख विभागमुक्तपीठशिक्षण
Previous Post

‘सुखांत अंत्यसंस्कार’ सेवेचा स्टॉल थेट दिल्लीतील आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात!

Next Post

भारतातील सर्वात स्वस्त PMV Eas-E इलेक्ट्रिक कार, किंमत ५ लाखांपेक्षाही कमी; लवकर बुक करा!

Next Post
PMV EAS-E Electric Car

भारतातील सर्वात स्वस्त PMV Eas-E इलेक्ट्रिक कार, किंमत ५ लाखांपेक्षाही कमी; लवकर बुक करा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!