Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एका गाव, एक गणेशोत्सवाचा सुवर्णमहोत्सव साजरा करणारे गाव! निसर्गाच्या कोंदणातील एकच उत्सव!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
one village one Ganesha

गौरव संतोष पाटील / पालघर

डहाणू तालुक्यातील कुणबी व आदिवासी समाजाची लोकवस्ती असलेलं उर्से गाव. या गावाची लोकसंख्या अडीच हजाराच्या आसपास आहे. डोंगराच्या कुशीत आणि सूर्या नदीच्या तिरावर हे गाव वसलंय. एक शांत, सुखद वातावरण असलेलं निसर्गरम्य गाव म्हणजे उर्से. या गावाचं तेवढंच वैशिष्ट्य नाही, तर या गावाची परंपरा आहे पुरोगामी विचारांची. श्रद्धेला जपतच या गावाने “एक गाव एक उत्सवाच्या” माध्यमातून जनते समोर एक आदर्श उभा केला आहे. या आदर्श संकल्पनेतून गणेशोत्सव आयोजनाचं हे पन्नासावं वर्ष.

गणेशोत्सव म्हटलं की, जिथं नजर जाईल तिथं बाप्पांचं दर्शन घडतं. मग गावागावांत असो पाड्यापाड्यांत असो किंवा गल्लोगल्ली असो. जिथं- तिथं घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांचे गणपती दिसून येतात. जिल्ह्यात घरोघरी दीड , अडीच आणि पाच दिवसांचा तर सार्वजनिक गणेश मंडळामध्ये पाच , सात आणि अकरा दिवसांसाठी बाप्पांची स्थापना होते. मात्र एक गाव एक गणपती सारखी संकल्पना क्वचितचं ठिकाणी दिसून येते. अशाच गावांपैकी एक गाव म्हणजे उर्से.

गेल्या ५० वर्ष्यापासून उर्से गावातील सर्व समाजाचे महिला, पुरुष व अबालवृद्ध उत्सवांसाठी एकत्र येतात. सार्वजनिक गणेशोस्तव ,सार्वजनिक गौरी उत्सव ,नवरात्रौत्सव, गोपाळकाला यासह सर्व सण अखंड एकत्र एवून आनंदाने साजरे करत आहेत. दर वर्षी गणपती व गौरी उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व खेळांचे आयोजन केले जाते. या गावाला अध्यात्मिक परिवाराची शिकवण आहे. हाच आदर्श ह्या गावान जोपासला आहे. कोणत्याही घरी घरगुती गणपती बसविला जात नाही. संपूर्ण गाव एकाच ठिकाणी एकत्र येउन सर्व उत्सव साजरे करतात. विशेष म्हणजे गावातील तरुण एकत्र येवून डेकोरेशन आणि आरास असतात. आरासही इको फ्रेंडली असते. या गणेशोत्सवाचं यंदाचा पन्नासावा सुवर्ण महोत्सवी वर्ष असून यावर्षीही गावातील तरुणांनी एकत्र येऊन इको फ्रेंडली देखावा तयार करायला सुरुवात केली आहे.

यावर्षी उर्से गावातील गणेशोत्सवाचं पन्नासावा सुवर्ण महोत्सवी वर्ष असून यावर्षी गणपती आणि गौरी या दोन्ही उत्सवांसाठी विविध सांस्कृतिक आणि पारंपारिक कार्यक्रमांचा आयोजन मंडळांनी केलं असून अनेक मान्यवर या कार्यक्रमांसाठी उपस्थिती दर्शवणार आहेत .

विशेष म्हणजे ह्या गावामध्ये तीन मंडळे कार्यरत असून कोणत्याही प्रकारची देणगी गावाच्या बाहेरून स्वीकारली जात नसून सर्व आर्थिक बाब हि गावकरीच गोळा करतात .या गावाने एक आपले स्वतःचे भव्य सभागृह कोणतीही देणगी न घेता उभे केले आहे गावाचे सर्व गावकरी येथेच आपले सर्व सण एकत्र साजरे करतात. तर सर्व काम ही श्रमदानातून केली जातात. गावाची परंपरा अशी कि गणपती व गौरी विसर्जनानंतर शिल्लक राहिलेल्या सर्व वस्तूंचा लिलाव केला जातो व भगवंतावरचा भाव म्हणून गावकरी सर्व वस्तू चढ्या भावाने आनंदाने खरेदी करतात. यामधून उरलेले पैसे गरजवंत गावातील शेतकऱ्यांना व्याजाने वाटप केले जातात. पुढील वर्षी ह्याच पैश्यातून हे सण साजरे करतात. दर वर्षी नवीन मंडळाचे पदाधिकारी बिनविरोध निवडले जातात.

गावात उत्सव काळात जुगार व नशेलाही पूर्णपणे विरोध असतो. तसे करणारास दंड आकारला जातो. येथे कोणताही पोलीस बंदोबस्त बोलाविला जात नाही. कारण गावातील वातावरण एखाद्या कुटुंबासारखं आहे. उर्से गावकरी सांगतात, सामाजिक भावनेतून संघटित व्हावे हा एकतेचा सामाजिक संदेश ह्या माध्यमातून आम्ही देतो. विघ्नहर्त्याच्या उत्सवात सुखच नांदावं हाच आमचा अखंड प्रयत्न असतो… गावात फिरताना खरोखरच प्रसन्नतेचा दरवळ सर्वत्र अनुभवता येतो…

पाहा:


Tags: Dahanu talukaganeshotsavgood newsKunbi and tribal societymuktpeethone village one GaneshaUrse villageउर्से गावएक गांव एक गणपतीकुणबी व आदिवासी समाजगणेशोत्सवघडलं-बिघडलंचांगली बातमीडहाणू तालुकामुक्तपीठ
Previous Post

राज्यात १४४४ नवे रुग्ण, २००६ बरे! मुंबई ५१६, नाशिक ११, नागपूर २ नवे रुग्ण !!

Next Post

इटंरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणं आता अधिक सोपं! वाचा नवी सरकारी अधिसूचना…

Next Post
international driving license

इटंरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणं आता अधिक सोपं! वाचा नवी सरकारी अधिसूचना...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!