Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आईच्या वाढदिवसाला संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना रेशन किटची आपुलकीची भेट!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Jijau Educational Social Institution

मुक्तपीट टीम

महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप बराच काळ सुरुच आहे. सरकारकडून पगारवाढ झाली असली तरी सरकारी सेवेत विलिनीकरणाची मागणी मान्य होत नसल्याने एसटी कर्मचारी मागे हटण्यास तयार नाहीत. त्यातच सुरुवातीला त्यांच्यासोबत असलेले राजकीय आणि कामगार संघटनांचे नेतेही मागे फिरल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे हाल सुरु आहेत. त्यातही बदलीच्या ठिकाणी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याची दखल घेत जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अनेक आगारांमधील संपकरी कर्मचाऱ्यांना रेशन किटची भेट दिली. २८ जानेवारी रोजी त्यांच्या आई भावनादेवी भगवान सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त ही आपुलकीची भेट देण्यात आली. सांबरे कुटुंबिय तसेच जिजाऊचे पदाधिकारी वेगवेगळ्या एसटी आकारांमध्ये दिवसभर फिरत होते. तेथे त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी किट भेट दिले.

 

एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या रेशन किटमध्ये आवश्यक धान्य, तेल, इतर शिधा आहे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे किटमधील तांदुळ हे घरच्या शेतात पिकवलेले घरातील वापराचे आहेत. उगाचच द्यायचे म्हणून आम्ही देत नाही, तर आपुलकीनं एसटी कर्मचाऱ्यांना आपलं मानून ही भेट देत आहोत, असे निलेश सांबरे यांनी सांगितले. वेळोवेळी आपण आपले वडिल भगवान सांबरे हे स्वत: एसटी सेवेत होते हे सांगतो, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांशी आपलं एक वेगळं नातं असल्याचेही त्यांनी सांगितले. जव्हार, वाडा, डहाणू, बोईसर, पालघर, सफाळे,भिवंडी, शहापूर,मुरबाड व ठाणे बस डेपो मधील २४०० कर्मचाऱ्यांना अन्नधान्याचे मोफत किट वाटप करण्यात आले.

 

वेगवेगळ्या आगारांमध्ये झालेल्या या कार्यक्रमांसाठी संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे, मजूर कामगार संस्थेचे अध्यक्ष पंडित पाटील, मोनिकाताई पानवे, हेमांगीताई पाटील, पालघरचे जिल्हा परिषद सदस्य संदेश ढोणे, हबीब शेख, किसन बोंद्रे, केदार चव्हाण, परेश कारंडे, रवींद्र खुताडे, जावेद खान, अजित जाधव, पंकज पवार, पिंका पडवले, अरविंद देशमुख यांच्यासह जिजाऊच्या सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

रक्तदान शिबिराचंही आयोजन

कल्याणमधील दहागाव येथील जिजाऊ संघटनेच्या विभागाच्या वतीने सौ. भावनादेवी भगवान सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये ३० रक्तदात्यांनी रक्तदान करून आईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच भिवंडी शहर येथे मोफत रेशनकार्ड कॅम्प राबविण्यात आला व प्रौढ साक्षरता वर्गाचं उदघाटन करण्यात आलं.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: Contact ST StaffJijau Educational Social InstitutionJijau Organization DepartmentKalyan DahagaonKindness GiftMaharashtra ST employeesMother's BirthdayMrs. Bhavnadevi Bhagwan SambrePresident Nilesh SambreRation KitThane and Palghar Districtअध्यक्ष निलेश सांबरेआईचा वाढदिवसआपुलकीची भेटकल्याण दहागावचांगल्या बातम्याजिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थाजिजाऊ संघटना विभागठाणे आणि पालघर जिल्हामुक्तपीठरेशन किटसंपकरी एसटी कर्मचारीसौ. भावनादेवी भगवान सांबरे
Previous Post

राज्यात २२ हजार ४४४ नवे रुग्ण, ३९ हजार ०१५ रुग्ण बरे होऊन घरी!

Next Post

अॅप्पल आणि सॅमसंगचे भारतात ३७ हजार कोटींच्या फोनचे उत्पादन! निर्यातही!

Next Post
Apple Samsung

अॅप्पल आणि सॅमसंगचे भारतात ३७ हजार कोटींच्या फोनचे उत्पादन! निर्यातही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!