मुक्तपीट टीम
महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप बराच काळ सुरुच आहे. सरकारकडून पगारवाढ झाली असली तरी सरकारी सेवेत विलिनीकरणाची मागणी मान्य होत नसल्याने एसटी कर्मचारी मागे हटण्यास तयार नाहीत. त्यातच सुरुवातीला त्यांच्यासोबत असलेले राजकीय आणि कामगार संघटनांचे नेतेही मागे फिरल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे हाल सुरु आहेत. त्यातही बदलीच्या ठिकाणी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याची दखल घेत जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अनेक आगारांमधील संपकरी कर्मचाऱ्यांना रेशन किटची भेट दिली. २८ जानेवारी रोजी त्यांच्या आई भावनादेवी भगवान सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त ही आपुलकीची भेट देण्यात आली. सांबरे कुटुंबिय तसेच जिजाऊचे पदाधिकारी वेगवेगळ्या एसटी आकारांमध्ये दिवसभर फिरत होते. तेथे त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी किट भेट दिले.
एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या रेशन किटमध्ये आवश्यक धान्य, तेल, इतर शिधा आहे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे किटमधील तांदुळ हे घरच्या शेतात पिकवलेले घरातील वापराचे आहेत. उगाचच द्यायचे म्हणून आम्ही देत नाही, तर आपुलकीनं एसटी कर्मचाऱ्यांना आपलं मानून ही भेट देत आहोत, असे निलेश सांबरे यांनी सांगितले. वेळोवेळी आपण आपले वडिल भगवान सांबरे हे स्वत: एसटी सेवेत होते हे सांगतो, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांशी आपलं एक वेगळं नातं असल्याचेही त्यांनी सांगितले. जव्हार, वाडा, डहाणू, बोईसर, पालघर, सफाळे,भिवंडी, शहापूर,मुरबाड व ठाणे बस डेपो मधील २४०० कर्मचाऱ्यांना अन्नधान्याचे मोफत किट वाटप करण्यात आले.
वेगवेगळ्या आगारांमध्ये झालेल्या या कार्यक्रमांसाठी संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे, मजूर कामगार संस्थेचे अध्यक्ष पंडित पाटील, मोनिकाताई पानवे, हेमांगीताई पाटील, पालघरचे जिल्हा परिषद सदस्य संदेश ढोणे, हबीब शेख, किसन बोंद्रे, केदार चव्हाण, परेश कारंडे, रवींद्र खुताडे, जावेद खान, अजित जाधव, पंकज पवार, पिंका पडवले, अरविंद देशमुख यांच्यासह जिजाऊच्या सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
रक्तदान शिबिराचंही आयोजन
कल्याणमधील दहागाव येथील जिजाऊ संघटनेच्या विभागाच्या वतीने सौ. भावनादेवी भगवान सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये ३० रक्तदात्यांनी रक्तदान करून आईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच भिवंडी शहर येथे मोफत रेशनकार्ड कॅम्प राबविण्यात आला व प्रौढ साक्षरता वर्गाचं उदघाटन करण्यात आलं.
पाहा व्हिडीओ: