Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अखेर कोकणाला नवसाचा विमानतळ…पण उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री ठाकरे आणि राणेंच्या टोलेबाजीनंच गाजला!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
chipi airport

मुक्तपीठ टीम

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा विषय चांगलाच चर्चेत आहे. या चिपी विमानतळचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. वर्षानुवर्षे वाट पाहावी लागल्यानं नवसाच्या मुलासारखा लाडका ठरलेल्या या विमानतळाचा शुभारंभ गाजला तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या टोलेबाजीमुळेच जास्त!

chipi airport

चिपी विमानतळाच्या उद्घाटन समारंभात अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात राजकीय जुगलबंदी रंगताना पाहायला मिळाली. या कार्यक्रमानिमित्त जवळजवळ १६ वर्षांनी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच व्यासपीठावर आले होते. यादरम्यान दोघांनी एकमेकांकडे पाहिलंही नाही.

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सर्वांसमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला अनेक मुद्द्यांवरून लक्ष्य केले. नारायण राणे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव घेत केली. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही मागे हटले नाही. भाषणाच्या पहिल्याच वाक्यापासून नारायण राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यास त्यांनी सुरूवात केली.

chipi airport

राणेंच्या भाषणात शिवसेनेला टोमणे

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्यावेळीच बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या निमित्ताने चिमटे काढले. ते म्हणाले, उद्धवजी, तुम्हाला सर्व माहिती मिळते. तुम्हाला ब्रीफ होतं. पण ती माहिती चुकीची आहे. तुम्ही माहिती घ्या. गुप्तपणे माहिती घ्या. तुमचे लोक काय करतात याची माहिती घ्या. तुम्हाला सत्य कळेल. राणे तेवढ्यावरच थांबले नाहीत. ते उद्धव टाकरेंना म्हणाले की, बाळासाहेबांना खोटं बोलणं कधी आवडलं नाही. खोट्याला त्यांनी थारा दिला नव्हता. वाईट बुद्धीने बोलायचं. यायचं हे चांगलं नाही. चांगल्या मनाने या. आम्ही तुमचं स्वागत करू, असं राणे म्हणाले.

आज कोकण प्रदेश आणि माझ्या कोकणी बांधवांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे! पंतप्रधान श्री @narendramodi जी यांच्या नैतृत्वाखाली आणि आमच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नांनी व पाठपुराव्यामुळे आज महाराष्ट्रातील बहूप्रतिक्षीत चिपी (सिंधुदुर्ग) विमानतळ… pic.twitter.com/UDatWTpyLb

— Narayan Rane (@MeNarayanRane) October 9, 2021

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाषणात राणेंना दिले प्रत्युत्तर

  • चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा हा क्षण आदळआपट करण्याचा नाही, आनंद व्यक्त करण्याचा आहे.
  • कोकणाच्या मातीत बाभळी आणि आंब्याची दोन्ही झाडे उगवतात. त्यामध्ये मातीचा दोष नसतो. त्यामुळे कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
  • नारायण राणेंच्या प्रत्येक टोमण्याला उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला आणि उत्तर दिले.
  • काही लोक पाठांतर करुन बोलतात, पण अनुभवाने बोलणे वेगळं असतं. मनातील मळमळ बोलून दाखवणे हे तर त्यापेक्षाही वेगळे असते.
  • आज या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. इतका चांगला क्षण असताना त्याला गालबोट लागू नये म्हणून एक काळं तीट असावं लागतं, तसेच काही लोक आज याठिकाणी आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Sindhudurg Greenfield Airport Inauguration-LIVE #ChipiAirport https://t.co/fixR5bssZq

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 9, 2021

 

राणेंनी ऐकवली साहेबांची प्रेरणा, तर ठाकरेंनी ऐकवली साहेबांनी केलेली हकालपट्टी!

“सिंधुदुर्गाचा विकास कोणत्या माध्यमातून करता येईल याचा विचार मी केला. मी छोटा-मोठा उद्योजकही आहे. त्यावेळी विमानतळ उभारण्याचा मुद्दा माझ्यासमोर आला. उद्धवजी हे सर्व मी साहेबांच्या प्रेरणेतून आत्मसात केले आहे.” असे ही नारायण राणे म्हणाले. नारायण राणे यांनी आपल्या भाषणात, ‘बाळासाहेबांना खोटं बोलणं कधी आवडलं नाही. खोट्याला त्यांनी थारा दिला नाही’, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर उध्दव ठाकरेंनी या जाब घेत म्हटलं की, “नारायणराव, बाळासाहेबांना खोटं बोलणारी लोकं आवडत नाहीत, हे खरंच आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी तेव्हाच अशा लोकांना शिवसेनेतून बाहेर काढले होते, हा सुद्धा इतिहास आहे.”

 

chipi


Tags: cmo uddhav thackerayinauguration of chipi airportNarayan raneSindhudurgचिपी विमानतळनारायण राणेमुक्तपीठमुख्यमंत्री उध्दव ठाकरेसिंधुदुर्ग-मुंबई विमान
Previous Post

“कोरोना रुग्णसेवेसाठी निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये”

Next Post

दिपाली सय्यद यांची महिला बाउन्सर पथक निर्मितीची घोषणा

Next Post
Deepali Sayad

दिपाली सय्यद यांची महिला बाउन्सर पथक निर्मितीची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!