मुक्तपीठ टीम
कोरोना चीनसह अनेक देशांना पुन्हा संक्रमित करत आहे. भारतात सध्या स्थिती चांगली आहे. मात्र, सरकारने सुरक्षेच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. काही निर्बंध परत लादण्यात आली आहेत. ओमायक्रॉनचा उप-प्रकार BF.7 विषाणू केवळ प्रतिकारशक्ती कमी करण्यातच पारंगत नाही, तर त्याची संसर्ग क्षमता पूर्वीच्या प्रकारापेक्षा अनेक पटीने अधिक आहे. त्याचा भारतात परिणाम जाणवलेला नसल्याचं सांगितलं जात असल्यानं घाबरण्याची परिस्थिती नाही, पण काळजी घेण्यासाठी या विषाणूबद्दल जाणून घेऊया.
Omicron BF.7 व्हायरस प्रतिकारशक्तीला गुंगारा देण्याबरोबरच संसर्गातही वेगवान!
- ९० दिवसांत चीनमधील ६० टक्के लोकसंख्येला याचा संसर्ग झाला आहे.
- सध्या देशात कोरोनाचे एकूण ३४०८ रुग्णांची नोंद झाली आहे.
- नोंद झालेल्या ३४०८ रुग्णांपैकी केवळ १३२ रुग्ण नवीन आहेत.
- देशातील बहुतेक नागरिकांना लस देण्यात आली आहे.
- ९८ टक्के लोकांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे.
- परंतु सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
‘हे’ खा आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवा…
- थंड हवामानात रोगप्रतिकारक शक्ती राखण्यासाठी तुळस आणि गिलोय सोबत आवळा, टोमॅटो, सुंठ, काळी मिरी, लवंग, दालचिनी यांचे नियमित सेवन करा.
- जेवणात थंड पदार्थ टाळा.
- फणस, पडवळ, घिया, गाजर, पालक, झुचीनी, तेंडली इत्यादी भाज्यांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
- आंबा, सफरचंद, पपई, डाळिंब, चिकू, द्राक्षेही फायदेशीर आहेत.
- टोमॅटो आणि इतर हंगामी भाज्यांचे गरम सूप प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होत नाही.
‘हे’ ही उपयुक्त आहेत…
- अश्वगंधा, हळद, अर्जुन, कुटकी, आवळा, मुसळी, विदारीकंद, सुंठ, हरड, स्वर्ण भस्म, रजत भस्म, ताम्र भस्म, वंग भस्म, लोहा भस्म इत्यादी फायदेशीर आहेत.
- खोकला, सर्दी, ताप किंवा घसा खवखवल्यास चव्हणप्राश, अगस्त्य हरितकी, वसवलेह, सितोपलादी चूर्ण, तालीसाडी चूर्ण, लक्ष्मी विलास रस, टंकण भस्म, गोदंती भस्म, सर्वांगसुंदर रस, संजीवनी वटी इत्यादी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता.