मुक्तपीठ टीम
इलेक्ट्रिक वाहनांची मागणी भारतातही वाढतेच आहे. या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ओकिनावा ऑटोटेकने भारतात हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर ओकिनावा ओखी९० लाँच केली आहे. सरकारने सूट दिल्याने त्याची किंमत वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगळी ठेवण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीच्या वेबसाइट किंवा डीलरशिपवरून २ हजार रुपये भरून बुक केली जाऊ शकते.
ओकिनावाच्या ओखी९०चे भन्नाट फिचर्स
- ओकिनावाच्या ओखी९० इलेक्ट्रिक स्कूटरला १६ इंच अलॉय व्हील मिळतात.
- देशातील इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दिलेल्या चाकांपैकी ही सर्वात मोठी चाके असल्याचा कंपनीचा दावा आहे.
- पुढील आणि मागील दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक आहेत.
- तसेच, यात एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेल लाइट आणि एलईडी डीआरएल देण्यात आले आहेत. ही स्कूटर अॅपला जोडते.
- यात टर्न बाय टर्न नेव्हिगेशनची सुविधाही आहे.
- याचे क्रोम प्लेटेड रियर व्ह्यू मिरर्सने जबरदस्त लुक येते.
- ओखी९० च्या सीटची उंची ९००एमएम आहे तर व्हीलबेस १५२०एमएम आहे.
इलेक्ट्रिक स्कूटर ओखी९०चे स्पेसिफिकेशन
- ओखी९० इलेक्ट्रिक स्कूटरबाबत कंपनीचा दावा आहे की, ती एका चार्जमध्ये १६० किमीची रेंज देते.
- त्याचा टॉप-स्पीड ८० ते ९० किमी प्रतितास इतका आहे.
- ही स्कूटर अवघ्या १० सेकंदात ९० किमी ताशीचा वेग पकडते.
- ओकिनावाने ग्राहकांच्या सोयीसाठी काढता येईल अशी बॅटरी दिली आहे. ही बॅटरी ३.६ केडब्ल्यूएचची आहे.
- ८०% बॅटरी फक्त १ तासात चार्ज होते. १००% बॅटरी चार्ज होण्यासाठी ३ ते ४ तास लागतात.
- स्कूटरची बूट स्पेस ४० लीटर आहे आणि ती २५० किलोपर्यंत भार वाहून नेऊ शकते.
ओखी९० इलेक्ट्रिक स्कूटर ४ रंगांमध्ये उपलब्ध आहे. हे रंग ग्लॉसी वाईन रेड, ग्लॉसी पर्ल व्हाइट, ग्लॉसी अॅश ग्रे आणि ग्लॉसी ज्वेलरी ब्लू आहेत. यासोबतच कंपनी ३ वर्षांची वॉरंटीही देईल. भारतीय बाजारपेठेत, ओखी९० इलेक्ट्रिक स्कूटर ओला एस१ प्रो आणि अॅथर ४५० प्लस व्यतिरिक्त बजाज चेतक आणि टीव्हीएस आयक्यूबशी स्पर्धा करेल.