मुक्तपीठ टीम
इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत चालली आहे. सर्व कंपन्या त्यांची इलेक्ट्रिक वाहने बाजारत लाँच करत आहेत. ओकायाने भारतीय बाजारपेठेत त्यांच्या दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Okaya Fasst F2B आणि Fasst F2T लाँच केल्या आहेत. सर्वांसाठी परवडणाऱ्या किमतीत ओकायाने इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत.
ओकाया इलेक्ट्रिक स्कूटर बॅटरी पॅक
- कंपनीने त्यामध्ये २.२ के डब्लू एच/ एलएफपी बॅटरी पॅक दिला आहे.
- ही बॅटरी २००० वॉल्टच्या इलेक्ट्रिक मोटरसह जोडलेली आहे.
- या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये एका चार्जमध्ये ८० किमी पर्यंतची रेंज आणि ७० किमी प्रति तासाचा टॉप स्पीड देण्याची क्षमता आहे.
ओकाया इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत
- ओकायाच्या या दोन्ही स्कूटरची किंमत १ लाखांपेक्षा कमी आहे.
- ओकाया फास्ट F2T ची किंमत ८४.९९९ रुपये आणि ओकाया फास्ट F2B ची किंमत ८९,९९९ रुपये आहे.
- ही किंमत एक्स-शोरूम दिल्लीची किंमत आहे.
दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरवर लाँच ऑफर…
- लाँच ऑफर्स अंतर्गत, कंपनीने आयएम इलेक्ट्रिक स्कूटरवर अनेक प्रकारच्या योजना आणि ऑफर देण्यात आली आहे.
- या ऑफर्स अंतर्गत, रोख बक्षिसे, लॅपटॉप, टीव्ही आणि कार यासारख्या भेटवस्तू जिंकू शकता.
- ही स्कूटर देशभरातील ५०० पैकी कोणत्याही आउटलेटवरून खरेदी करू शकता.