Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतकऱ्यांना अनुदानित दरात मिळणार महाबीजचा हरभरा

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
हरभरा

मुक्तपीठ टीम

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान व ग्रामबिजोत्पादन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी महाबीजचे हरभरा बियाणे अनुदानित दरात मिळणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाबीजचे कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक एन. जी. इनामदार यांनी केले आहे.

सोयाबीन व भात कापणी मळणीला सुरूवात झाल्याने रब्बी हंगामाची लगबग दिसून येत आहे. त्या अनुषंगाने शासनातर्फे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व ग्रामबिजोत्पादन योजना जिल्ह्यात कृषी विभागातर्फे राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेमध्ये जिल्ह्याला ४२८ क्विंटल बियाणे वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत परमिट वाटप होणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान या योजनेंतर्गत हरभरा (दहा वर्षाआतील वाण) ४५ रूपये प्रति किलो या अनुदानित दराप्रमाणे तर ग्रामबिजोत्पादन योजनेंतर्गत हरभरा (दहा वर्षाआतील वाण) ४५ रूपये प्रति किलो व दहा वर्षावरील वाण ५२ रूपये प्रति किलो या अनुदानित दराप्रमाणे महाबीजच्या वितरकांकडे उपलब्ध होणार आहे. या योजनेंतर्गत दहा वर्षाआतील हरभरा फुले विक्रम, राजविजय-२०२, एकेजी-११०९, ठळड-१०२१६ व दहा वर्षावरील विजय, दिग्वीजय, विशाल व जॅकी-६२१८ हे वाण उपलब्ध होणार आहेत.

हरभरा दहा वर्षाआतील वाणाची मूळ किंमत ७० रूपये प्रति किलो आहे. यामध्ये अनुदान २५ रूपये प्रति किलो असून अनुदानित दर ४५ रूपये प्रति किलो आहे. हरभरा दहा वर्षावरील वाणाची मूळ किंमत ७२ रूपये प्रति किलो आहे. यामध्ये अनुदान २० रूपये प्रति किलो असून अनुदानित दर ५२ रूपये प्रति किलो आहे. या योजनेत एका शेतकऱ्याला सातबारा, आधारकार्ड घेऊन एक बॅग वितरीत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एन. जी. इनामदार यांनी केले आहे.


Tags: farmersGood news MorningMahabeezगुड न्यूज मॉर्निंगमहाबीजराष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान व ग्रामबिजोत्पादन योजनाशेतकरीहरभरा
Previous Post

DRDOद्वारा विकसित १० तंत्रज्ञानांचे तंत्रज्ञान हस्तांतरणविषयक परवाना करार १३ उद्योगांना सुपूर्द

Next Post

Okaya Fasst F2B आणि Fasst F2T इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच!

Next Post
Okaya Scooters

Okaya Fasst F2B आणि Fasst F2T इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!