Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्याचे मारेकरी पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचे, व्हिडीओमागे दंगलीचा हेतू

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Rajasthan Tailor Murder

मुक्तपीठ टीम

प्रेषित मोहम्मद पैगंबरांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्या कन्हैयालाल या टेलरची राजस्थानमध्ये झालेली हत्या देशभरात खळबळ माजवणारी ठरली. ही अमानुष हत्या करणारे मारेकरी मोहम्मद रियाज आणि गौस मोहम्मद मारेकरी हे पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची शक्यता आहे. त्यांनी टेलरची गळा कापून हत्या करतानाचा व्हिडीओही तयार केला. त्यामागे त्यांचा हेतू दहशत माजवत दंगल भडकवण्याचा हेतू होता. त्यामुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही तो व्हिडीओ प्रसारीत, पोस्ट न करण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत एनआयए म्हणजे राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेकडे तपास सोपवला आहे.

राजस्थानच्या उदयपूरमध्ये ही घटना घडली आहे. मोहम्मद रियाज आणि गौस मोहम्मद या मारेकऱ्यांनी मंगळवारी कपडे शिवण्याच्या बहाण्याने दुकानात घुसून तलवारीने त्याच्यावर अनेक वार करून त्याचा गळा चिरला. या संपूर्ण हल्ल्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आहे. त्यामुळे मारेकऱ्यांचा हेतू केवळ त्या पोस्टचा बदला घेण्याचा नसून दंगल भडकावण्याचाही असल्याचा संशय आहे. त्यांचे संबंध दावत-ए-इस्लामी या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे. त्याचवेळी उदयपूरमध्ये तणाव निर्माण झाला असून आंदोलन सुरू झाले आहे. तणाव पसरू नये म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

  • उदयपूरच्या मालदास स्ट्रीट परिसरात मंगळवारी मोहम्मद रियाज आणि गौस मोहम्मद या दोघांनी कन्हैयालाल या टेलर तरुणाचा गळा चिरला.
  • काही दिवसांपूर्वी या तरुणाने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.
  • त्यानंतर त्याला अटकही झाली होती. पण नंतर सर्व समाजांनी एकत्र येऊन शांतता प्रस्थापित केली.
  • मात्र आता तरुणाची हत्या केल्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
  • या दोन्ही व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे.

मुख्यमंत्री अशोत गेहलोतांकडून घटनेचा निषेध!!

  • अशोक गेहलोत यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ‘उदयपूरमधील तरुणाच्या निर्घृण हत्येचा निषेध करतो. या घटनेत सहभागी असलेल्या सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
  • पोलीस गुन्ह्याच्या तळापर्यंत जातील. मी सर्व पक्षांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. अशा निर्घृण गुन्ह्यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल.

व्हिडीओ शेअर न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन!!

    • मुख्यमंत्री गेहलोत यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘मी सर्वांना आवाहन करतो की, या घटनेचा व्हिडिओ शेअर करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नका. व्हिडिओ शेअर करून समाजात द्वेष पसरवण्याचा गुन्हेगाराचा हेतू सफल होईल.

मारेकऱ्यांना अटक, पाकिस्तानी दहशतवाद्यांशी संबंध!

  • उदयपूरमध्ये कन्हैयालालची हत्या करणारे मारेकरी मोहम्मद रियाज आणि गौस मोहम्मद हे दोघेही ‘दावत-ए-इस्लामी’ नावाच्या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत.
  • मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही ही हत्या नेहमीसारखी नसून वेगळी असल्याचं सांगितलं.
  • उदयपूरमधील नुपूर समर्थक शिंप्याच्या हत्येचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली होती.
  • केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रकरणातील पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा अँगल लक्षात घेत तपास एनआयएकडे सोपवला आहे.

 

NIA Registers a Case in the Incident of Brutal Murder of Shri Kanhaiya Lal Teli in Udaipur, Rajasthan pic.twitter.com/YtI48NHSJy

— NIA India (@NIA_India) June 29, 2022


Tags: Cm Ashok GehlotKanhaiyalalNupur SharmaRajasthanकन्हैयालालनुपूर शर्मामुख्यमंत्री अशोह गेहलोतराजस्थान
Previous Post

एनएचएआयमध्ये ‘टेक्निकल डेप्युटी मॅनेजर’ पदाच्या ५० जागांवर करिअर संधी

Next Post

बहुमत चाचणी : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठक! काय घडणार?

Next Post
Floor test in maharashtra

बहुमत चाचणी : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठक! काय घडणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!