मुक्तपीठ टीम
प्रेषित मोहम्मद पैगंबरांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्या कन्हैयालाल या टेलरची राजस्थानमध्ये झालेली हत्या देशभरात खळबळ माजवणारी ठरली. ही अमानुष हत्या करणारे मारेकरी मोहम्मद रियाज आणि गौस मोहम्मद मारेकरी हे पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची शक्यता आहे. त्यांनी टेलरची गळा कापून हत्या करतानाचा व्हिडीओही तयार केला. त्यामागे त्यांचा हेतू दहशत माजवत दंगल भडकवण्याचा हेतू होता. त्यामुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही तो व्हिडीओ प्रसारीत, पोस्ट न करण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत एनआयए म्हणजे राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेकडे तपास सोपवला आहे.
राजस्थानच्या उदयपूरमध्ये ही घटना घडली आहे. मोहम्मद रियाज आणि गौस मोहम्मद या मारेकऱ्यांनी मंगळवारी कपडे शिवण्याच्या बहाण्याने दुकानात घुसून तलवारीने त्याच्यावर अनेक वार करून त्याचा गळा चिरला. या संपूर्ण हल्ल्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आहे. त्यामुळे मारेकऱ्यांचा हेतू केवळ त्या पोस्टचा बदला घेण्याचा नसून दंगल भडकावण्याचाही असल्याचा संशय आहे. त्यांचे संबंध दावत-ए-इस्लामी या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे. त्याचवेळी उदयपूरमध्ये तणाव निर्माण झाला असून आंदोलन सुरू झाले आहे. तणाव पसरू नये म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
- उदयपूरच्या मालदास स्ट्रीट परिसरात मंगळवारी मोहम्मद रियाज आणि गौस मोहम्मद या दोघांनी कन्हैयालाल या टेलर तरुणाचा गळा चिरला.
- काही दिवसांपूर्वी या तरुणाने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.
- त्यानंतर त्याला अटकही झाली होती. पण नंतर सर्व समाजांनी एकत्र येऊन शांतता प्रस्थापित केली.
- मात्र आता तरुणाची हत्या केल्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
- या दोन्ही व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे.
मुख्यमंत्री अशोत गेहलोतांकडून घटनेचा निषेध!!
- अशोक गेहलोत यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ‘उदयपूरमधील तरुणाच्या निर्घृण हत्येचा निषेध करतो. या घटनेत सहभागी असलेल्या सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
- पोलीस गुन्ह्याच्या तळापर्यंत जातील. मी सर्व पक्षांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. अशा निर्घृण गुन्ह्यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल.
व्हिडीओ शेअर न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन!!
-
- मुख्यमंत्री गेहलोत यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘मी सर्वांना आवाहन करतो की, या घटनेचा व्हिडिओ शेअर करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नका. व्हिडिओ शेअर करून समाजात द्वेष पसरवण्याचा गुन्हेगाराचा हेतू सफल होईल.
मारेकऱ्यांना अटक, पाकिस्तानी दहशतवाद्यांशी संबंध!
- उदयपूरमध्ये कन्हैयालालची हत्या करणारे मारेकरी मोहम्मद रियाज आणि गौस मोहम्मद हे दोघेही ‘दावत-ए-इस्लामी’ नावाच्या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत.
- मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही ही हत्या नेहमीसारखी नसून वेगळी असल्याचं सांगितलं.
- उदयपूरमधील नुपूर समर्थक शिंप्याच्या हत्येचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली होती.
- केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रकरणातील पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा अँगल लक्षात घेत तपास एनआयएकडे सोपवला आहे.
NIA Registers a Case in the Incident of Brutal Murder of Shri Kanhaiya Lal Teli in Udaipur, Rajasthan pic.twitter.com/YtI48NHSJy
— NIA India (@NIA_India) June 29, 2022