Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘ई-नोज’ द्वारे कोणताही नमुना न देता होणार रोगाची चाचणी

आरोग्यसेवेतल्या महत्वपूर्ण उपकरणाबाबत जाणून घ्या

September 6, 2026
in आरोग्य, चांगल्या बातम्या
0
आरोग्य

मुक्तपीठ टीम

आता रक्त किंवा इतर कोणताही नमुना न देता रोगाचं निदान होऊ शकणार आहे. ‘ई-नोज’ (इलेक्ट्रॉनिक नोज) उपकरणामुळे हे शक्य झाले आहे. परिणामी रोगाचं निदान करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या चाचण्यांपासून सुटका मिळणार आहे. याचा सर्वाधिक फायदा हा कोरोना, दमा, यकृताशी संबंधित रोग तसेच अनेक प्रकारच्या कर्करोगांचं निदान करण्यासाठी होऊ शकेल. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, हे उपकरण पुढील दोन-तीन वर्षांत आरोग्यसेवेमध्ये क्रांती घडवेल. ब्रिटनमध्ये त्याच्या क्लिनिकल चाचण्यांचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले आहेत. केंब्रिजस्थित कॅन्सर रिसर्च यूके हे संशोधक आणि डॉक्टरांसाठी श्वासोच्छश्वासाची चाचणी घेत आहे.

 

रोग ओळखण्याबरोबरच, या तंत्रज्ञानाद्वारे रुग्णाला कोणत्या नवीन औषधाचा विशेष फायदा होऊ शकतो किंवा केले जात असलेले उपचार योग्य परिणाम घडवत आहेत की नाही याचाही अभ्यास केला जात आहे. डिव्हाइसमध्ये सिलिकॉन डिस्पोजेबल मास्क आहे जो कॅमेरा-आकाराच्या गॅझेटशी जोडलेला आहे.

 

बायोटेक कंपनी ऑलस्टोनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिली बॉयल यांनी सांगितलंय की, त्यांचे उपकरण यकृत रोग तसंच कोलन कर्करोग शोधण्यात सक्षम आहे. आपण सोडत असलेल्या श्वासात सुमारे ३,५०० अस्थिर सेंद्रिय संयुगे (VOCs), वायूचे कण आणि थेंब असतात. या व्हीओसीचे रासायनिक स्वरूप प्रत्येक बाबतीत वेगळे असते. या मुखवटामधील सेन्सर श्वासाचे विश्लेषण करतात.

 

बालरोग छातीचे चिकित्सक डॉ अँड्र्यू बुश म्हणतात की, हे सिद्ध झाले आहे की आपल्या श्वासामध्ये उपस्थित रसायने आरोग्याची स्थिती सांगतात. ऑलस्टोनच्या उपकरणामध्ये, आम्ही या आधारावर काम केले आहे.

 

श्वासामध्ये अमोनियाची उच्च पातळी म्हणजे लिवर-किडनीची समस्या

  • नेदरलँडमधील रेडबाउंड युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरचे प्राध्यापक. पीटर सेर्सेमा सांगतात की, आतडी आणि कोलन कर्करोग श्वासात होणाऱ्या रासायनिक बदलांद्वारे शोधले जात आहेत. परंतु आता लिवर-किडनीच्या समस्या असलेल्या लोकांच्या श्वासात अमोनियाच्या उच्च पातळीसारख्या समस्यांचादेखील शोध घेतला जात आहे.
  • जर्मनीच्या एअरसेन्सने पेन ३ ई-नोज डिव्हाइसला पीसीआर चाचणीमध्ये सकारात्मक परिणामांद्वारे व्हायरस ओळखण्यास शिकवले आहे. ते ई-नोज ८० सेकंदांनंतरच कोरोना ओळखू शकेल. संशोधकांना विश्वास आहे की, ई-नोज गर्दीच्या ठिकाणी रिअल-टाईम निदान करण्यास सक्षम असू शकते.

Tags: e noseelectronic nosemuktpeethआरोग्यइलेक्ट्रिक नोजई-नोजमुक्तपीठ
Previous Post

हनुमान उडीसारखाच डिजिटल विक्रम! हनुमान चालीसाला यूट्युबवर २०० कोटी व्ह्यूज!!

Next Post

एका चार्जिंगमध्ये १२०० किमीचा पल्ला, अमेरिकन कंपनीच्या एसयूव्हीची भन्नाट क्षमता!

Next Post
triton

एका चार्जिंगमध्ये १२०० किमीचा पल्ला, अमेरिकन कंपनीच्या एसयूव्हीची भन्नाट क्षमता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!