Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हनुमान उडीसारखाच डिजिटल विक्रम! हनुमान चालीसाला यूट्युबवर २०० कोटी व्ह्यूज!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
hanuman chalisa

मुक्तपीठ टीम

गुलशन कुमारांच्या हनुमान चालीसाचा हरिहरन यांच्या आवाजातील व्हिडीओ यूट्यूबवर प्रचंड लोकप्रिय आहे. महाबली हनुमानाचे भक्त तो पाहतातच पाहतात. टी-सीरिजच्या या व्हिडीओला यूट्यूबवर २ अब्जाहून अधिक म्हणजे २०० कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. भारतातील हा पहिला यूट्युब व्हिडीओ आहे ज्याने २०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

 

यूट्युब कमाईचा मोठा मार्ग!

टी-सीरिजच्या कमाईचा मोठा स्त्रोत म्हणजे त्याचे यूट्युब व्हिडीओ. टी-सीरिजला मुख्य यूट्यूब चॅनेल आणि प्लॅटफॉर्मवरील उप-चॅनेलवर 100 करोड व्युज आहेत. यूट्युब इंडिया २०१९ व्ह्यूअरशिप रिपोर्टनुसार, टॉप १० गाण्यांपैकी ६ गाणी टी-सीरिजची आहेत आणि टॉप १०० गाण्यांपैकी ४९ गाणी टी-सीरिजची आहेत. २०० कोटी व्ह्यूज ओलांडलेल्या हनुमान चालीसाचा व्हिडीओ हरिहरन यांनी गायला आहे, पण गुलशन कुमार व्हिडीओमध्ये दिसत आहेत. टी-सीरिजचे विनोद भानुशाली यांनी या यशानंतर आनंद व्यक्त केला आणि गुलशनजींचे जगात आपले स्थान निर्माण करण्याचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे सांगितले.

 

टी-सीरीजचा विक्रम

  • टी-सीरिजच्या हनुमान चालीसा या व्हिडीओने २८ मे २०२० रोजी १०० कोटी व्ह्यूजचा टप्पा गाठला.
  • तेव्हा देखील तो सर्वात जास्त पाहिला जाणारा व्हिडीओ होता.
  • म्हणजेच कोरोनाच्या काळात त्याचे व्ह्यूज झपाट्याने वाढले.
  • हा व्हिडीओ २०११ मध्ये म्हणजेच ९ वर्षांपूर्वी युट्युब वर अपलोड करण्यात आला होता.
  • १०० कोटी व्हूज मिळाल्यानंतर, गुलशन कुमार यांचा मुलगा भूषण कुमार म्हणाले होते, “पप्पा, तुमच्या प्रार्थना नेहमी आमच्यासोबत असू द्या आणि त्याच प्रकारे आम्हाला अधिक यशस्वी होण्यास मदत करा.”
  • हनुमान चालीसा हा व्हिडीओ दररोज लाखो वेळा पाहिला जातो.
  • हे गाणे हिंदू कुटुंबांमध्ये मोठ्या श्रद्धेने ऐकले जाते.

 

युट्युबवर सर्वाधिक पाहिली जाणारी भारतातील टॉप ५ गाणी

  •  गुलशन कुमार आणि टी-सीरिजचे हरिहरन यांची हनुमान चालीसा (भक्ती सागर): २ अब्ज+ व्ह्यूज
  • मन्नत नूरी गाणे लाँग लाची: १.३४ अब्ज+ व्ह्यूज
  • जॅस मनक लेहेंगा : १.३३ + व्ह्यूज
  • ध्वनी भानुशालीचे वास्ते: १.२७ अब्ज+ व्ह्यूज
  • मेरी २ मधील राऊडी बेबी: १.२५ अब्ज+ व्ह्यूज

Tags: hanuman chalisaIndiamuktpeetht-seriesटी-सीरीजयूट्युबयूट्युब चॅनल्सहनुमान चालीसा
Previous Post

राज्यात १,५५३ नवे रुग्ण, तर १,६८२ रुग्ण बरे होऊन घरी!

Next Post

‘ई-नोज’ द्वारे कोणताही नमुना न देता होणार रोगाची चाचणी

Next Post
आरोग्य

'ई-नोज' द्वारे कोणताही नमुना न देता होणार रोगाची चाचणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!