मुक्तपीठ टीम
जर कोण इंडिया पेमेंट सिस्टम अंतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट बँकद्वारे व्यवहार करत असेल, तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता येत्या १५ जूनपासून इंडिया पोस्ट पेमेंट बँक पैशांच्या व्यवहारावर शुल्क वसूल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आधारकार्ड आधारित पेमेंट प्रणालीद्वारे केलेल्या व्यवहारांवर सेवा शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आधारकार्ड आधारित पेमेंट प्रणालीद्वारे केलेल्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारत नव्हती.
एका महिन्यात तीनपेक्षा जास्त व्यवहारांसाठी सेवा शुल्क
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने नुकत्याच जारी केलेल्या अधिसूचनेत, आधारकार्ड आधारित व्यवहारांवर बँकेला सेवा शुल्क भरावे लागेल असे सांगण्यात आले आहे. बँकेच्या अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की, जर तुम्ही एका महिन्यात तीन वेळा आधारकार्डद्वारे व्यवहार केला तर, तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. त्याच वेळी, जर तुम्ही एका महिन्यात तीनपेक्षा जास्त वेळा आधार क्रमांकाद्वारे व्यवहार केला तर, सेवा शुल्क भरावा लागेल.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक आधारकार्ड आधारित पेमेंट प्रणालीद्वारे आकारण्यात येणारे शुल्क
- इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या अधिसूचनेनुसार, एका महिन्यात तीनपेक्षा जास्त वेळा आधार क्रमांकाद्वारे पैसे जमा किंवा काढण्यासाठी, प्रत्येक व्यवहारावर २० रुपयांचा सेवा शुल्क द्यावा लागेल.
- ही रक्कम जीएसटी म्हणून वसूल केली जाईल.
- त्याच वेळी, जर एखाद्या व्यक्तीने मिनी स्टेटमेंट तयार केले तर त्याला २० अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.
आधार आधारित पेमेंट सिस्टम काय आहे?
- आधार आधारित पेमेंट सिस्टम ही बँकिंगची सर्वोत्तम मॉडेल सेवा आहे, ज्यामध्ये आधार पडताळणीद्वारे पीओएस म्हणजेच मायक्रो एटीएमवरून ऑनलाइन व्यवहाराची सुविधा दिली जाते.
- यासह एकूण दहा प्रकारचे व्यवहार सुलभ झाले आहेत.
- यामध्ये मिनी स्टेटमेंट काढणे, पैसे जमा करणे, पैसे काढणे, शिल्लक तपासणे, ट्रान्झॅक्शन आणि भीन आधार पेमेंट इत्यादींचा समावेश आहे.