मुक्तपीठ टीम
मुंबईमध्ये आता रेल्वेने प्रवास करताना पैसे सोबत घेऊन जाण्याची गरज नाही. टीसी आता कार्ड पेमेंट सेवा वापरत आहेत ज्यामुळे सर्व व्यवहार हा कॅशलेस असणार आहे. टीसी आता ट्रेनमध्ये कॅशलेस व्यहारासाठी पॉईंट ऑफ सेल म्हणजेच पीओएस मशीन वापरत आहेत. यामुळे टीसी आणि प्रवाशांना सुट्टे पैशांसाठी होणारा त्रास नसेल.
मुंबईत पश्चिम रेल्वेमधील टीसींना ८० मशीन वितरित करण्यात आल्या आहेत. यामागे कॅशलेस व्यवहारांना चालना देण्याचा उद्देश आहे. लवकरच सर्व टीसीना पॉश मशिन देण्यात येतील, जेणेकरुन रेल्वेगाड्यांमध्ये पूर्णपणे कॅशलेस व्यवहार होऊ शकेल.
पॉश मशीनच्या वापरामुळे लोकांचा सिस्टमवरील विश्वास वाढेल. लोकांना खात्री वाटेल की त्यांचे पैसे कोणत्याही विशिष्ट व्यक्तीच्या खिशात जात नसून सरकारकडे जात आहेत. तसेच टीसींनाही आराम मिळेल. त्यांना सुट्टे पैश्यांसाठी त्रास होणार नाही.
टीसीला ट्रेनमध्ये अनेक प्रकारच्या लोकांकडून दंड वसूल करावा लागतो. जसे की ३५ किलोपेक्षा जास्त वजन घेऊन चालणे, ट्रेनमध्ये थुंकणे किंवा सिगारेट ओढणे, पाच वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांसह तिकिटाशिवाय प्रवास करणे, ज्याचे पास वेडिंग लिस्ट असेल आणि प्रवास करीत आहे, अगदी तिकिटशिवाय प्रवास करणारे सुद्धा.