Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता माफक दराने पाण्याचा दर्जा तपासून मिळणार

February 13, 2021
in सरकारी बातम्या
0
gulabrao patil

मुक्तपीठ टीम

 

जल जीवन मिशन या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत पाणी गुणवत्ता, सनियंत्रण आणि सर्वेक्षण कार्यक्रमांमध्ये ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. राज्यातील ग्रामीण जनतेला पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या दर्जाबाबत विश्‍वास वृद्धिंगत करण्यासाठी व जनजागृतीसाठी सार्वजनिक पाणी तपासणी मोहीमेव्यतिरिक्त खाजगी नमुने तपासणीला प्रोत्साहन देण्यासाठी माफक दरात पाणी तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला आहे अशी माहिती, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पाणी तपासणीच्या दरामध्ये सुधारणा करणे अपेक्षित होते. प्रयोगशाळेत खाजगी पाणी नमुने तपासणीसाठी विहित केलेले दर ८०० रुपये ऐवजी ६०० रुपये प्रमाणे निर्धारित करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेमध्ये खाजगी पाणी नमुने तपासणीचा खर्च, त्याकरिता लागणारा वेळ यामुळे खाजगी पाणी नमुने तपासण्यासाठी सामान्य नागरिकांचा जास्त प्रतिसाद मिळत नव्हता. राज्यातील ग्रामीण जनतेला खाजगी पाणी नमुने फिल्ड टेस्ट किट्सच्या मदतीने तपासणी करून देण्यासाठी रासायनिक व जैविक घटकांसाठी प्रत्येकी ५ रुपये इतक्या माफक दरात राज्यातील सर्व विभागीय, जिल्हा व उपविभागीय प्रयोगशाळामध्ये सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

रासायनिक तपासणीमध्ये धातू, विरघळणारे क्षार, नाइट्रेट, फ्लोराइड, लोह यांची तपासणी करण्यात येणार असून त्यासाठी प्रति नमुना ५ रुपये शुल्क राहील तर जैविक दृष्ट्या पाणी पिण्यास योग्य असल्याची प्राथमिक तपासणी करण्यासाठी ५ रुपये प्रति नमुना शुल्क राहील. याप्रमाणे फिल्ड टेस्ट किट्सद्वारे प्रयोगशाळेत तपासणी करण्यासाठी १० रुपये इतका दर आकारण्यात येणार आहे.

फिल्ड टेस्ट किट्सद्वारे तपासणीसाठीचे हे दर शासकीय, सहकारी, खाजगी संस्था, शैक्षणिक संस्था, संशोधक, विद्यार्थी व ग्रामीण भागातील व्यक्ती यांच्यासाठी लागू राहतील. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अधिनस्त प्रत्येक प्रयोगशाळांमध्ये खाजगी पाणी नमुने तपासण्यासाठी पाणी नमुना व अर्ज जमा केल्यास पाणी नमुन्यांची प्राथमिक फिल्ड टेस्ट किटच्या द्वारे करण्यात येईल. प्राथमिक दृष्ट्या दूषित आढळून आलेल्या पाणी नमुन्यांची सखोल तपासणी प्रयोगशाळेमध्ये विहित शुल्क आकारून करण्यात येईल, अशी माहितीही पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.


Tags: Minister Gulabrao PatilWater Life Missionwater qualityजल जीवन मिशनपाण्याचा दर्जामंत्री गुलाबराव पाटील
Previous Post

मुंबई होणार भिकारीमुक्त! पोलीस सहआयुक्त नांगरे पाटील सरसावले!

Next Post

“अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि श्रीवर्धनला ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा”

Next Post
aditya thackeray

"अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि श्रीवर्धनला ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!