मुक्तपीठ टीम
जेव्हा जेव्हा टोकियो ऑलिम्पिक २०२० चा उल्लेख होईल, तेव्हा भारताच्या ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची आठवण येईल. टोकियो ऑलिम्पिकमधील भारताची शेवटची स्पर्धा भालाफेक होती आणि सर्वांच्या नजरा नीरजवर होत्या. नीरजच्या सुवर्णपदकापूर्वी भारताजवळ एकूण सहा पदके होती. ज्यात दोन रौप्य आणि चार कांस्यपदकांचा समावेश होता. संपूर्ण देशाला नीरजकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. त्याने हार न मानता भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आणि तिरंगा डौलात फडकवला. मात्र, नीरज सहजासहजी गोल्डन बॉय नाही झाला. यामागे त्याचे अथक, निरंतर परिश्रमही आहेत.
नीरजचा संघर्ष…शून्यातून शिखराकडे!
- सुवर्णपदक पटकावणाऱ्या आणि कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळवणाऱ्या नीरजकडे एकेकाळी दीड लाख रुपये किंमतीचा भाला खरेदी करण्यासाठी आणि प्रशिक्षक घेण्यासाठीही पैसे नव्हते.
- ही कमतरता त्याने आपल्या प्रामाणिक परिश्रमाने दूर केली.
- ऑलिम्पिक खेळांमध्ये भारताला अॅथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
- एवढेच नाही तर नीरज वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा फक्त दुसरा भारतीय आहे.
सुवर्णपदक जिंकताच अष्टदिशातून जणू सुवर्ण वर्षाव!
- हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर सरकार 6 कोटी रुपये देणार आहेत.
- नीरज चोप्राची सुवर्ण कामगिरी पाहता, हरियाणा सरकारने नीरजला ६ कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे.
- यासोबतच त्याला क्लास-१ अधिकारीच्या नोकरीची ऑफर दिली जाईल.
- त्याचबरोबर त्यांना ५० टक्के सूट असलेला भूखंडही दिला जाईल.
- या दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पंचकुलामध्ये खेळाडूंसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स इमारत देखील बांधण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
- हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, “नीरजची इच्छा असल्यास त्याला या केंद्राचे प्रमुख बनवले जाईल.
- गुरुग्राममधील रियल्टी कंपनी इलान ग्रुपचे अध्यक्ष राकेश कपूर यांनी टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताचे सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा यांना २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
हरयाणाबाहेरूनही कौतुक आणि बक्षीसांचा वर्षाव
- कॅप्टन अमरिंदर सिंग यांची २ कोटी रुपये देण्याची घोषणा
- आनंद महिंद्रा नीरज चोप्राला देणार एक्सयूव्ही ७०० ची भेट
- इंडिगो एअरलाइन्स नीरजला एक वर्षासाठी मोफत प्रवासाची सुविधा देणार आहे.
- बीसीसीआयतर्फे एक कोटी रुपयांची भेट
- चेन्नई सुपर किंग्स १ कोटी रुपये देईल.
ट्विटरवरील शिफारशीनंतर महिंद्रांची घोषणा
- महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी नीरजला एसयूव्ही एक्सयूव्ही ७०० ची भेट देण्याचे जाहीर केले आहे.
- सुवर्ण पदक जिंकल्यानंतर थोड्याच वेळात महिंद्रानी ही घोषणा केली.
• एका ट्विटरकरानं महिंद्रा यांना नीरजला एक्सयूव्ही७०० भेट देण्याचे सुचवले. महिंद्रांनी जाहीर केले.