मुक्तपीठ टीम
जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगल आपल्या यूजर्सना इतर अनेक प्रकारच्या सेवा देत असते. गुगल त्याच्या वापरकर्त्यांना बातम्या, पेमेंट, ड्राइव्ह, फोटो, शोपिंग, ईमेल यासह अनेक सेवा पुरवते. गुगलची मेल सर्व्हिस म्हणजेच जीमेल वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता इंटरनेटशिवाय देखील mail.google.com वरील मेसेज वाचू शकता आणि त्यांना प्रतिसाद देऊ शकता. गुगल सपोर्टनुसार, mail.google.com वर मेसेज वाचण्यासोबतच, इंटरनेट नसतानाही रिप्लायही करता येणार आहे.
इंटरनेटशिवाय जीमेल कसे वापरावे?
- जीमेल ऑफलाइन वापरण्यासाठी, लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा मोबाइलमध्ये क्रोम वेब ब्राउझर असणे आवश्यक आहे.
- सर्वप्रथम जीमेल ऑफलाइन सेटिंग्जमध्ये जावे लागेल.
- यानंतर,https://mail.google.com/mail/u/0/#settings/offline या लिंकवर क्लिक करा.
- आता Enable Offline Mail वर क्लिक करा.
- आता सोयीनुसार आणि गरजेनुसार मागील दिवसांचा डेटा निवडा.
- त्यानंतर Save Changes वर क्लिक करा.
- लक्षात ठेवा की जीमेलचा ऑफलाइन मोड सीक्रेट विंडोमध्ये वापरले जाऊ शकत नाही.
ईमेलचे फायदे
- ईमेलचा मुख्य फायदा म्हणजे ईमेल पेपरलेस आहे.
- सूचना आणि स्टेटस अपडेट्सची कागदपत्रे पेपरमध्ये टाइप करून वितरित करण्यापेक्षा मेलद्वारे पाठविली जाऊ शकतात.
- ईमेलसाठी अलर्ट सेट केले जाऊ शकते.
- ईमेल शेड्यूल केले जाऊ शकते जेणेकरून प्राप्तकर्त्यांना इच्छित वेळी मेल प्राप्त होतील.
- एकाच मेलद्वारे विविध लोकांना सहजपणे मेल केले जाऊ शकते आणि ते त्यांना लवकर प्राप्त होतात.
- क्लाउड स्टोरेज म्हणून, हे मेलबॉक्समध्ये कायमचे सेव केले जाऊ शकते.
- ईमेलमुळे वेळ वाचण्यास मदत होते.